“दिल दोस्ती दुनियादारी” मालिकाफेम सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. मालिकेत एकत्रित काम करत असतानाच दोघांचे प्रेम जुळले होते. यानंतर दोघांनी ” अमर फोटो स्टुडिओ “मध्येही काम केले. यादरम्यान सखीला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागले त्यामुळे अमर फोटो स्टुडिओला तिने राम राम ठोकला होता. तिथे असतानाही सखी आणि सुव्रत एकमेकांना भेटत असल्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते.

एवढेच नाही तर सुव्रतने व्हॅलेंटाईन दे च्या दिवशी सखी साठी एक खास चिठ्ठी देखील लिहिली होती. यावरून अनेकांनी त्यांना लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला होता. परंतु आम्ही दोघे आताच लग्न करणार नसल्याचे त्यात तिने नमूद केले.
काही दिवसांपूर्वी सखीने बॅचलर पार्टी साजरी केली होती त्याचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर केले होते. यानंतर हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. बुधवारी संगीत सेरेमनीचे फोटो तिने शेअर केले.११ तारखेला ,गुरुवारी ह्या दोघांनीही अगदी थाटात आपले लग्न उरकले असल्याचे समोर येत आहे. सखी आणि सुव्रत यांच्या ह्या लग्नात दिल दोस्ती दुनियादारी मधील सर्वच सहकलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *