“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम.

खरे तर कोणत्याही व्यक्तीला वृद्धाश्रमात जावे लागते ही एक खेदाचीच बाब म्हणावी लागेल.परंतु अशाच अनाथ मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी मराठमोळी अभिनेत्री पुढे सरसाऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे.” ये गो ये ,ये मैना” हे गाणे ज्या अभिनेत्रीवर चित्रित झाले ती अभिनेत्री म्हणजे दीपाली भोसले- सय्यद होय. दिपालीने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकेत सुंदर भूमिका साकारल्या आहेत. मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे, लाडी गोडी सोबत बंदिनी मालिकाही तिने साकारली आहे.

१ एप्रिल १९७८ साली तिचा जन्म झाला. पुढे तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. ३१ मे २००८ साली बॉबी खान सोबत तिने लग्न केले. आणि ती चित्रपटांत काहीशी दिसेनासी झाली. ती एक उत्तम अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगना देखील आहे. अनेक रंगमंचावर तिने आपल्या नृत्याच्या अदाकारी दाखवल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच दिपलीने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी स्वतःच्या नावाने सर्वात मोठे वृद्धाश्रम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामात तिला तिच्या गावकाऱ्यांकडूनही मोलाची साथ मिळत आहे. तिच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. आमच्याकडूनही तिच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा..

महाराष्ट्रातील सर्वात मोठे वृद्धाश्रम व अनाथालय हे नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठिकाणी दीपाली भोसले – सय्यद फाउंडेशन च्या माध्यमातून साकारले जाणार आहे. ……….,……………………….. .नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्रतील सर्वात मोठया दिपाली भोसले –सय्यद वृद्धाश्रम व अनाथलय. Tumacha ashirwad asu dya🙇‍♀️ #deepalisayed #actres #actor #deepalibhosalesayed #foundation #vrudhashram #anathashram #dream #thanq #🙇‍♀️ #behappy😊 #bepositive✌ #loveurself #bless #me #deepu #😘

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed) on

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *