ही अभिनेत्री खरोखरच जाणार मालिका सोडून…प्रेक्षकांसाठी तिने लिहिले हे खास पत्र नक्की वाचा

एखादा कलाकार मालिकेत एखादं पात्र साकारताना ते पात्र किती आत्मीयतेने प्रेक्षकांसमोर मांडतो, हे त्या कालावंतालाच ठाऊक असते. पात्र साकारणारी व्यक्ती मालिकेतून बाजूला झाली की आपसूकच, ती असायला पाहिजे होती… अशी भावनाही प्रेक्षक व्यक्त होताना दिसतो. मध्यंतरी ” माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील मालिका सोडून जाणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.याचा परिणाम मालिकेवर पडू नये आणि जोवर शनायाला साजेशी कलाकार पर्याय म्हणून मिळत नाही तोवर तिला हि मालिका सोडता येणार नव्हती यामुळे तिने इंटरव्हिव देऊन मालिका सोडणार नसल्याची बातमी दडली.

Guru chi shanaya Radhikachi shanya Atharvachi offscreen shannu Bakulachi shenya Baki bhaitad, vedi, innocent.. saglyanchi.. Shanaya haak aaiku aali ki valaichi savay zali hoti, ahe. Itka ki majhi aai pan mala shannuch mhante 😄 Hya muline khup kahi dila mala.. hya baddal mi adhi hi lihilay pan aaj tichya athvanit lihtanna veglach vattay kahitari.. Ekhada patra kartanna tya patrashi ek jiv hona kay asta he mala shanaya ne shikavla. Ticha sukh, ticha hasu, ticha dukkha, ticha raag, ticha prem, ticha swartha, saglach majha zala hota, ahe. Mhanun pan anekda action mhantlyavar padar chi vakya apsuk yaychi, aatun, manatun karan tenvha phakta shanaya bolaychi.. Arthat tumhi tumchya premani tila dokyavar uchlun dharla mhanunach nehmi mala apan kahitari barobar kartoy ha dilasa milat gela ani tumchyasobat mi hi swatahachya nahi pan tichya premat padle hote, ahe. Shanaya chya babtitla tumcha prem kayam asu dya, Rasika la matra ashirwaad dya! Nirop ghet nahiye, navin kahitari gheun yeinach!! Tumcha Rasika varcha prem ani vishwas hi majhi takad ahe te tasach rahudya 🙏🏻. Ani ata thodech divas mi tumhala shanaya sakartanna disnar ahe tyamule he majhe shevatche kahi bhaag avarjun paha, jata jata thoda vegla karu pahilya te hi kasa vattay kalva! Vel tar tumhala mahiticche!! Pahat raha Majhya Navryachi Baiko ratri 8 vajta phakta Zee Marathi var!!

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

पण आता ती हि मालिका सोडून जाणार हे नक्की झालय. या बाबत तिनेही शिक्कामोर्तब केला असून एक भावनिक पत्र आपल्या फेसबुक वर अपलोड केले आहे. खरे तर रसिका पेक्षा शनया हेच नाव तिला जास्त आपलेसे वाटू लागले होते. वास्तवात तिची आई देखील तिला याच नावाने हाक मारत असल्याचे ती सांगते. शनयाचं हसणं, बोलणं, राग व्यक्त करणं हे सगळं तीचंच झालं होतं .ती ह्या भूमिकेच्या इतकी प्रेमात पडली होती की, ऍक्शन म्हटल्यावर देखील आपसूकच पदरची वाक्ये टाकली असल्याचे ती म्हणते. प्रेक्षकांनी शनयाच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद परंतु रसिकाला मात्र तुमचा आशीर्वाद असू द्या, “निरोप घेत नाहीये! नवीन काहीतरी घेऊन येईनच !” असे म्हणत किमान शेवटचे काही भाग आवर्जून पाहण्यासाठी तीने प्रेक्षकांना विनंती देखील केली आहे.
तेव्हा रसिका सुनील मालिकेतून निघून जाणार हे आता स्पष्ट झाले असून तिच्या आग्रहाखातर तरी किमान मालिकेचे शेवटचे भाग पाहायला विसरू नका…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *