हि मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई .. नुकताच झाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

गेल्याच वर्षीच म्हणजे २०१७ साली अभिनेत्री क्रांती रेडकर हीच समीर वानखेडे ह्यांच्याशी लग्न झालं. अगदी गुपचूप गुपचूक लग्न करणारी क्रांती रेडकर आता आणखीन एक आनंदाची बातमी देताना दिसणार आहे. नुकतच २५ ओक्टोम्बर रोजी तिच्या राहत्या घरी डोहाळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्याचा एक फोटोही तिने शेअर केला. पण हा नक्की कशा संदर्भातला फोटो आहे हे तिने सांगलीत नाही त्यामुळे तिचे चाहते संभ्रामात पडले. पण आता ती लवकरच आई बनणार हे अनेक कलाकारांनी उघड केले आहे त्यांबंधित फोटोही त्यांनी शेअर केले.


पण काही काळातच ते फोटोही डिलीट केले गेले. फोटो डिलीट कारण्यामागचं कारण समजू शकलं नाही. पण हि बातमी मात्र खरी असल्याने त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरवात केलीली सोशिअल मीडियावर पाहायला मिळतेय.
‘कोंबडी पळाली’ ह्या गाण्यामुळे प्रिसिद्धी मिळालेली अभिनेत्री क्रांती रेडकर एकामागोमाग एक चांगले चित्रपट करत गेली. ऑन ड्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, मर्डर मेस्त्री, नो एन्ट्री पुढे धोका आहे, जत्रा यांसारख्या चित्रपटात चांगला अभिनय केला. खूप कमी काळात चांगली कामगिरी करणारी अभिनेत्री आता प्रोड्युसर म्हणूनही काम पाहतेय. काकण ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले. तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा …

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *