हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात… पती आहे पुण्यातील मोठा बिजनेसमन

मराठीतून घवघवीत यश मिळवल्यानंतर हिंदी सृष्टीत आपले नशीब अजमाऊ पाहत असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत नेहा पेंडसे हिचे नाव घेतले जाते. बिग बॉसच्या १२ व्या सिजनमध्ये मराठमोळी नेहा पेंडसे चमकली होती. प्रसिद्धीनंतर तिने हिंदी भाषिक रियालिटी शोमधून काम करण्यास सुरुवात केली. कपिल शर्माच्या शोमध्ये तिला महत्वाची भूमिका मिळाली. त्यामुळे नेहा आता हिंदीत चांगलीच रुळली असल्याचे दिसते यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आता तिच्या बाबतीत एक नवी बातमी समोर येत आहे

नेहा पेंडसे सध्या इटलीमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम वर बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर केला आहे. नेहा तिचा बॉयफ्रेंड “शार्दूल सिंग बयास” सोबत इटलीत असल्याचे तिने सांगितले याचठिकाणी शार्दूलने तिला प्रपोज केल्याचे सांगितले आहे. तिच्या या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. परंतु आम्ही अजून लग्नाचा विचार केला नसल्याचे तिने यात म्हटले आहे. पुढच्या वर्षी लग्नाचा विचार करणार असल्याचे टाइम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या मुलाखतीत तिने या बातमीचा खुलासा केला आहे.
शार्दूल हा पुण्यात वास्तव्यास आहे येथूनच त्याने आपले शिक्षण घेतले आहे यासोबतच तो आलिया कन्सल्टिंग सोल्युशन चा सीईओ आहे. इटलीत असताना त्याने नेहाला जाहीररीत्या प्रपोज करून सुखद धक्का दिला आहे.: नुकतीच ही बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या बातमीने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *