हि प्रसिद्ध अभिनेत्री आली होती चक्क पाकिस्तानातून …अदनान सामी, जावेद जाफरी अश्या कलाकारांसोबत तब्बल केली ४ लग्न

१९९१ साली “हिना” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऋषी कपूर, अश्विनी भावे यासोबत एक पाकिस्तानी अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. ती अभिनेत्री आहे “जेबा बख्तीयार”. जेबा या अभिनेत्रीने हिनाची भूमिका अगदी सुरेख बजावली होती. ह्या पहिल्याच चित्रपटामुळे जेबाला खूप प्रसिद्धी मिळाली. जेबा बख्तीयार हिचा जन्म पाकिस्तान येथे झाला. आपले शिक्षण झाल्यावर तिने पाकिस्तान टीव्ही मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. अनारकली ही तिची मालिका त्याकाळी खूपच गाजली होती.

राज कपूर यांनी हिना च्या भूमिकेसाठी तिची निवड केली होती. हिना चित्रपटानंतर जेबाने जय विक्रांता, स्टंटमॅन सारखे काही बॉलिवूड चित्रपट साकारले पण त्यात तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिने पुन्हा पाकिस्तानकडे आपली पावले वळवली. तिथे जाऊन तिने अनेक चित्रपट तसेच मालिका साकारल्या. १९९३ साली गायक अदनान सामी यांच्यासोबत तिने लग्न केले. त्यांना अजान हा एक मुलगाही झाला परंतु त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. अखेर १९९७ साली त्यांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याआधी १९८९ रोजी जेबाने बॉलिवूड अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरीसोबत लग्न केले होते परंतु वर्षभरातच म्हणजे १९९० साली त्यांनी घटस्फोट घेतला. जेबाचे तिसरे लग्न सलमान वलीयनी यांच्यासोबत झाले परंतु हे लग्नही टिकले नसल्याने तिने सोहेल खान लेगहारी यांच्यासोबत चौथ्या लग्नाचा घाट घातला. यामुळे जेबा चांगलीच चर्चेत येऊ लागली. या प्रसिद्धीमुळे पाकिस्तान मधील छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आजही ती साकारताना दिसत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *