हि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा

“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत राणूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महंगडे. तिची ही भूमिका खानण्याजोगीच आहे. छत्रपती महाराज यांच्या कन्येच्या भूमिकेत ती प्रेक्षकांसमोर आली. तिची ही भूमिका जबाबदारीने पार पाडून एक सक्षम अभिनेत्री होण्याचा मान तिने मिळवला आहे. अगदी सहजरित्या कोणतीही भूमिका साकारताना दिसते. अश्विनी मूळची सातारा जिल्ह्यातील पसरणी, वाई या गावात जन्मलेली मुलगी. वडिलांचे नाव प्रदीपकुमार तर आईचे नाव विद्या महंगाडे. तर मोठ्या बहिणीचे नाव मृण्मयी, ती वकील आहे.

अश्विनी महंगडे ही श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथून शालेय शिक्षण तर वाई येथील किसनविर महाविद्यालयातुन तिने बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे तिने हॉटेल मॅनेजमेंट ची पदविदेखील प्राप्त केली आहे. पण पुढे तिने अभिनयक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

रानुबाईंच्या भूमीके आधी तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत सुरेख भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील ” अस्मिता ” ही तिची मालिका विशेष लक्षणीय ठरली. यात तिने ‘मनाली’ उत्कृष्ट साकारली होती. लक्ष्य, ब्रह्मांडणायक, भेटी लागे जिवा, सावर रे, लक्ष्य या तिने अभिनयाने साकारलेल्या मालिका. बॉईज, उणीव, टपाल उभा चित्रपटातही तिने काम केले आहे. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील “राणूबाई”ची भूमिका तिला करायला मिळाली आणि छत्रपतींच्या मालिकेत अभिनय करायला मिळाला याचा तिला सार्थ अभिमान आहे.

महिलांना जागृत करण्यासाठी अश्विनी आता एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे . मासिक पाळीच्या संबंधित समस्या बाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी तिने “महावीर” या नावाने वेबसिरीज बनवत आहे. या वेबसिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून ती लोकांसमोर येत आहे. नुकताच तिला गावाकडच्या गोष्टी तर्फे “प्रेरणा पुरस्कार” देण्यात आला आहे.

याचे काही भाग तिने आपल्या गावात म्हणजे पसरणी या गावातच शूट केले असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर याचे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. केवळ पैसा मिळावा म्हणून नव्हे तर आपले मत व्यक्त व्हावे या भावनेने तिने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तिच्या या नवीन वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!….

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *