हिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस “बाळजीपंत ” यांची भूमिका साकारली या अभिनेत्याने…याआधी याच मालिकेत आणखी एक भूमिका साकारली

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा कालचा भाग तुम्ही पहिला असेल. हिंदवी स्वराज्याचे सरचिटणीस बाळजीपंत याना संभाजी महाराजांनी सदरेवर बोलावले. अण्णाजी पंतांच्या काटातील बाळजीपंत याच्यावरील शिक्षेची सुनावणी या सदरेवर करण्यात येणार आहे. संभाजी महाराजांनी बाळाजी काकांबद्दल केलेला न्यायनिवाडा आजच्या भागात दर्शवण्यात येणार आहे. बाळाजीपंतांनी साकारलेल्या या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच.याआधीही त्यांनी याच मालिकेत एका मुघल सरदाराची भूमिका निभावली होती.

खूप कमी लोकांच्या हे लक्षात असेल की त्यांनी दिलेरखानाच्या छावणीतील मुघल सरदार “बहादूर खान” यांची भूमिका साकारली होती. एक अभिनेता म्हणून त्यांच्या या भूमिकेचे देखील विशेष कौतुक पाहायला मिळाले. या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नाव आहे “नझर खान” .
नझर खान यांनी मराठी हिंदी चित्रपट, मालिका क्षेत्रात आपल्या अभिनयाचा चांगलाच जम बसवला आहे. क्राईम पेट्रोल, फिअर फाईल्स यासारख्या टीव्ही मालिकेत त्यांनी अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी खलनायक तर कधी इन्स्पेक्टर च्या भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. “खिडकी” चित्रपटातील भूमिकेसाठी नुकतेच त्यांना बेस्ट स्पोर्टिंग ऍक्टर चा मान मिळाला आहे. Cintaa( सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन ) च्या आऊटरिच हेल्थफुल साठी सायकोथिरपिस्टची भूमिका त्यांनी बजावली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागात जाऊन फिल्ममेकिंग वर्कशॉप आयोजित करताना दिसतात. अनिल कपूरच्या “राम लखन” चित्रपटात त्यांच्या मित्राची भूमिका त्यांनी बजावली होती. अश्या ह्या विविध रंगाने नटलेल्या अवली कलाकाराला आमचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *