हा मराठी अभिनेता नुकताच अडकला विवाह बंधनात.. कोल्हापुरात थाटामाटाट झाला विवाह संपन्न

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने मराठीतील अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत परंतु त्याला विशेष ओळख मिळाली ती झी मराठीवरील “आम्ही सारे खवय्ये” या शोमधून. गेली अनेक वर्षे या शोचे सूत्रसंचालन प्रशांत दामले करताना दिसले. त्यांची ही जागा आता बऱ्याच दिवसांपासून संकर्षण कऱ्हाडेने घेतलेली दिसते. एक उत्कृष्ठ अभिनेता आणि कवी म्हणून त्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात गेली अनेक वर्ष घर करून आहे. तुम्ही त्याचा छोटा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे ह्यालाही ओळखतच असाल.

संकर्षणचा धाकटा भाऊ “अधोक्षज कऱ्हाडे” हा देखील झी वाहिनीशी जोडला गेला आहे. त्याने काही निवडक मालिकेत छोट्याछोट्या भूमिका साकारल्या आहेत. झी वाहिनीच्या “दिवाळी जल्लोष” मध्येही त्याने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मे महिन्यात अधोक्षजचा ‘चैताली ढवळीकर’ हिच्यासोबत साखरपुडा झाला आणि काल मोठ्या थाटात त्याने आपले लग्न उरकल्याचे दिसते. चैताली ही मूळची कोल्हापूरची असून आर्किटेक्ट आहे. ‘सुमन शिल्प’ येथे ती लँडस्केप डिझायनर म्हणून काम पाहत आहे. अगदी थाटात उरकलेल्या ह्या लग्नाला सेलिब्रिटी वर्गाकडून अनेक शुभेच्छा देखील मिळत आहेत. अधोक्षज आणि चैताली यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा!!!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *