harishchandrachi factory actor

भारतीय चित्रपट निर्मितीचे जनक “दादासाहेब फाळके” यांच्या जीवनावर आधारित “हरिश्चंद्राची फॅक्टरी” हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. दादासाहेबांची भूमिका अभिनेते नंदू माधव यांनी साकारली होती तर त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांची भूमिका विभावरी देशपांडे यांनी साकारली होती. त्यांच्या मुलाची म्हणजेच भालचंद्र फाळके आणि महादेव फाळके यांची भूमिका अनुक्रमे साकारली होती ‘मोहित गोखले’ आणि ‘अथर्व कर्वे’ या दोन बालकलाकारांनी. अथर्व कर्वे हा बालकलाकार अनेकदा छोट्या पद्द्यावरून प्रेक्षकांसमोर आलेला पाहायला मिळाला.

marathi film actor
marathi film actor

झी मराठीवर नुकताच होऊन गेलेला महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोचा तो विताजेताही बनला होता. त्यामुळे अथर्व अनेकांच्या परिचयाचा बनला. परंतु मोहित गोखले हा बालकलाकार आज या क्षेत्रापासून थोडासा दुरावलेला पाहायला मिळतो. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास अकरा वर्षे लोटली आहेत. आज मोहित गोखले याच्याबद्दल अधीक जाणून घेऊयात… मोहित गोखले हा बालमोहनचा विद्यार्थी. पुढे डी जी रुपारेल कॉलेजमधून त्याने आपले शालेय शिक्षण घेतले. हरिशचंद्राची फॅक्टरी चित्रपटाव्यतिरिक्त त्याने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतून ज्ञानेश ( ज्ञाना) ची भूमिका आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवली होती. ‘२० म्हंजे २०’ या आणखी एका मराठी चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर आला. मधल्या काळात मनमय निर्मित ‘तरुण पिढी प्रेमात की भ्रमात’ ह्याची संकल्पना त्याने मांडली होती. हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट यातील भूमिकांमुळे मोहित आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहतो . मोहितला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *