‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत बाळूमामाचे वडील अर्थात मयप्पाची भूमिका अभिनेते रोहित देशमुख यांनी साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना कलर्स वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्यात तब्बल दोन नॉमीनेशन्स मिळाले होते. त्यांच्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण कुमार देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. नाटकाचं विद्यापीठ म्हणून रोहित देशमुख यांना त्यांच्या वडिलांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले. सुरुवातीला औरंगाबाद येथे असताना रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी काम पाहिले होते यासोबतच नाटकातुन देखील त्यांचा स्ट्रगल चालूच होता. पुढे मायानगरीत दाखल झाल्यावर ‘मी कुमार देशमुखांचा मुलगा आहे अशी ओळख सांगायची नाही तर स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची’ असे वडिलांनी बजावून सांगितले होते.

झी मराठीवरील “जय मल्हार” या लोकप्रिय मालिकेतून त्यांनी साकारलेली “कुंभक” ही विरोधी भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. आज झी वाहिणीच्याच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून “कान्होजी शिर्के” यांची भूमिका ते साकारत आहेत. ही जरी विरोधी भूमिका असली तरी त्यातून ऐतिहासिक भूमिका साकारण्याचे समाधान त्यांनी यातून व्यक्त केले आहे. रोहित देशमुख यांच्या आई आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळेच त्यांनी ह्या यशापर्यत मजल मारली असल्याचे सांगितले आहे. पत्नी अश्विनी देशमुख या पेशाने वकील परंतु स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून त्यांनी व्यवसायात उडी घेतली. आपला संसार आणि व्यवसायाचा व्याप सांभाळत त्यांनी आपल्या पतीला एक कलाकार म्हणून कायम प्रोत्साहन दिले. सध्या रोहित देशमुख ‘मयप्पा आणि कान्होजी शिर्के’ या दोन दमदार भूमिका साकारत आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *