“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेतील “लाडी ” बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? पाहण्यासाठी फोटो

झी मराठीवरील “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत संभाजी महाराज आणि राणी येसूबाईची भेट घडवून आणण्यासाठी “लाडी” ने खूप मोठी मदत केली असल्याचे दर्शवण्यात आले आहे. मालिकेतील “लाडी” ची भूमिका प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. ही भूमिका अभिनेत्री “मीनल बाळ” हिने साकारली आहे. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…. मालिकेतील लाडी म्हणजेच मीनल बाळ एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच तिची सोनी मराठी या नव्या वाहिनीवर ” हृदयात वाजे समथिंग ” ही मालिका सुरू झाली आहे.

” हृदयात वाजे समथिंग ” या मालिकेत तिने “अश्विनी ” ची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. याआधीही मिनलने अनेक एकांकिका स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. फायनल डिसीजन आणि कळत नकळत हे नाटकही तिने साकारले आहेत. “सावधान इंडिया” या मालिकेमध्ये देखील ती काही काळ वावरली आहे.
१३ डिसेंम्बर २००८ साली मिनलने प्रथमेश बाळ यांच्यासोबत लग्न गाठ बांधली. प्रथमेश हे सध्या इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड मध्ये कार्यरत आहेत. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ . मीनल आणि प्रथमेश बाळ यांना एक मुलगा आहे. हे संपूर्ण कुटुंब सध्या मुंबईत स्थायिक आहे.
मिनलला तिच्या “हृदयात वाजे समथिंग” या नवीन मालिकेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!!..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *