झी वाहिनीवरील संभाजी महाराज यांच्यावर आधारित ” स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतील “गणोजी” ची भूमिका स्वप्नील राजशेखर यांनी साकारली आहे. याआधीही त्यांनी अनेक ऐतिहासिक मालिकेत उत्तम भूमिका पार पाडल्या आहेत. “राजा शिवछत्रपती” मध्ये त्यांनी नेताजी पालकर, तर “वीर शिवाजी “मध्ये त्यांनी कान्होजी जेधे उत्कृष्ट साकारला आहे. त्यांनी अनेक नाटक, चित्रपट तसेच टीव्ही मालिकाही साकारल्या आहेत. अभिनयाचा वारसा मिळालेल्या ह्या अभिनेत्याबद्दल थोडं जाणून घेऊयात.

३१ मे १९७६ साली त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आईचे नाव वैशाली राजशेखर या कोल्हापूर येथील चांबुकवाडी या ठिकाणी ” मातोश्री वृद्धाश्रम “चे कामकाज सांभाळत आहेत. तर वडील राजशेखर भूतकर हे मराठी चित्रपट स्रुष्टीतील एक नवाजलेलं नाव. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.

राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर असे आहे त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९३६ सालचा. या सिने जगतातील “भालजी पेंढारकर” यांनीच त्यांनाचित्रपट सृष्टीत आणून हे नाव दिले असल्याचे सांगितले जाते. साधी माणसं, डोंगरची मैना, मराठा तितुका मिळवावा अशा अनेक चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. १९ व्या शतकातील त्यांचं नाव आजही अजरामर आहे. स्वप्नीलने देखील वाडीलांप्रमाणे या क्षेत्रात चांगलेच नाव कमावले आहे.

स्वप्नील गायक म्हणूनही वावरला आहे. १९९७ सालच्या गोवा झी अंताक्षरीचा तो विजेता बनला आहे. त्यानंतर त्याने वात्रट कार्टी, प्रेमा तुझा रंग कसा? या नाटकात काम केले. दूरदर्शन वरील अनेक मालिकेतही तो झळकला होता. एकाच प्याला ह्या नाटकासाठीही त्यांना उत्कृस्ट अभिनयाचा पुरस्कार मिळालाय. कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, राजमाता जिजाऊ, माणूस यासारख्या प्रसिद्ध चित्रपटाचा तो एक भाग बनला.

राजा शिवछत्रपती, स्वप्नांच्या पलीकडले, चार दिवस सासूचे, जयमल्हार या मालिकेत त्याला भूमिका मिळाल्या. ” खेळ मांडला ” या मालिकेसाठी त्याला उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला.

स्वप्नीलच्या पत्नीचे नाव तेजस्विनी असे आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सध्या ते कोल्हापुरात सहकुटुंब राहतात. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *