“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतील दिग्दर्शकाची पत्नी आहे त्याच मालिकेतील हि अभिनेत्री..

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेत आजवर अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका अगदी चोख बजावलेल्या पाहायला मिळाल्या. ह्या मालिकेने संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकल्याने पुढे काय घडणार यासाठी ही उत्कंठा मालिकेच्या प्रेक्षकवर्गात पाहायला मिळते. मालिकेत हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची भूमिका “देविका देशपांडे” या अभिनेत्रीने साकारली आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात….

अभिनेत्री देविका देशपांडे यांनी हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची भूमिका स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अतिशय उत्तम साकारली आहे. या मालिकेआधी त्यांनी रंगभूमीवरील “आईचं पत्र हरवलं ” या नाटकात शरयू ची भूमिका बजावली आहे. याच नाटकाचे दिग्दर्शन त्यांचे पती “विवेक देशपांडे ” यांनी केले आहे. विवेक देशपांडे हे नाट्य सृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ” स्वराज्यरक्षक संभाजी ” मालिकेत त्यांनी कार्तिक केंढे यांच्यासोबत दिग्दर्शकाची सूत्रे सांभाळली आहेत. ” स्वराज्यरक्षक संभाजी ” मालिकेत कलाकारांच्या भूमिकेवर खुश होऊन ते कलाकारांना चक्क कॅडबरी गिफ्ट देतात.
वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना एका सोहळ्यात मराठा सरदाराच्या मुलाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. त्यांची ही भूमिका नितीन मंत्री याना खूप आवडली. त्यानंतर त्यांना “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकात राजाराम राजे यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.त्यामुळे आयुष्यात अनेक वेळा ऐतिहासिक भूमिका साकारून प्रत्यक्षात “शिवाजी महाराज” अनुभवता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *