“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतील अण्णाजी दत्तो यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी हे जाणून आश्चर्य वाटेल

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेत अण्णाजी दत्तो यांची भूमिका अभिनेते ” महेश कोकाटे ” यांनी उत्तम साकारली आहे. ही त्यांची भूमिका विरोधी जरी असली तरी सहज सुंदर अभिनयाने ती उत्तम रंगवली आहे. याआधीही त्यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्यासोबत ” जनता राजा शिवछत्रपती ” या नाटकात कान्होजी जेधे ,बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिका साकारल्या आहेत. यात त्यांच्या उत्कृष्ट तलवारबाजीची झलकदेखील पाहायला मिळते. त्यांच्या बद्दल आणखी जाणून घेऊयात.

जो बिवी से करे प्यार, अकबर बिरबल, बडी दूर से आये है, खिडकी यासारख्या हिंदी मालिकेत त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बंदिनी या मालिकसोबत त्यांनी पछाडलेला, खतरनाक, चिमणी पाखरे, जत्रा ,अगडबम, नो प्रॉब्लेम सारखे दमदार चित्रपट साकारण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्यात कि क्वचितच एखादी भूमिका करायची राहून गेली असेल.
भरत जाधव सोबतच्या एका चित्रपटात त्यांनी नाच्याची भूमिकाही उत्तम पेलली. अवघड वाटणारी हि भूमिका अत्यंत हुशारीने आणि हुबेहूब साकारली. नाच्या म्हंटल कि लाजन मुरडणं लागत. मुळातच नाच्या सडपातळ असावा असं अनेकांचं मत पण त्यांनी हि भूमिका निभावली अन विरोध करणाऱ्यांची तोंड बंद झाली. त्यांना नाटकाची खूप आवड आहे त्यामुळेच मालिका चित्रपट क्षेत्रापेक्षा ते ‘रंगकर्मी’ म्हणून ओळखले जावे हीच त्यांची अपेक्षा आहे. महेश कोकाटे यांना त्यांच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा ..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *