भवानी तलवार महाराज्याना मिळाल्यानंतर आता पुढे काय झाले ते पाहुयात (तुम्हाला आधीची पोस्ट पाहणे गरजेचे आहे तर पुढील इतिहास समजेल)

शिवाजी महाराज तलवार घेऊन आपल्या गडावर आले. महाराज ह्या तलवारीनिशी लढाईची तालीम करू लागले तेव्हा त्यांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ लागल्या. हि तलवार फक्त दिसायला सुरेख नसून ती लढाईत करतानाही सोयीची आहे, तलवार लांबीला जवळपास साडेचार फूट असून वजन फक्त १२०० ग्राम आणि सामान्य तलवारी पेक्ष्या जवळपास फुटभर लांब. तलवारीच्या लांबीवरून महाराज्यांच्या लक्ष्यात आले कि जेव्हा आपण सराव करतो तेंव्हा आपण शत्रूच्या दूर काही अंतरावरूनही शत्रूवर सहज घाव घालू शकतो शिवाय शत्रूची तलवार आपल्यापर्यंत पोहचत हि नाही(मोघलांची उंची ६ ते साडेसहा फूट आणि मराठे ५ ते साडेपाच फूट अशी उंची होती ती ह्या तालवारीमुळे मातीमोल ठरली). तलवारीच्या दोन्ही बाजूस धार आणि अत्यंत हलकी असल्याने फिरवायला हि सोयीची आहे तसेच तिच्या मुठीला जे अस्तर (कापड) लावलेलं आहे त्यामुळे हाताला जरी घाम आला तरी तलवार हातातून निसटत नाही.

महाराजांनी अशी तलवार कोठे बनवता येईल याची बरीच माहिती घेतली, परंतु हि तलवार हिंदुस्तानात बनूच शकत नव्हती. परदेशातूनच आयात करावी लागणार होती.  तेव्हा त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, स्पॅनिश देशातील लोकांना बोलवून घेतले व आपल्याला ह्या प्रकारची तलवार हवीये असे सांगितले. स्पॅनिश लोकांना म्हणजेच स्पेनला तलवारी बनवायची मोठी ऑर्डर महाराजांनी दिली आणि तसा मोठा करार हि झाला. मोठ्या प्रमाणात तलवारीची पाती स्पेन वरून मराठ्यांना मिळु लागली(स्पेनची राजधानी माद्रिद मध्ये तोलेदो येथे सर्व तलवारी बनू लागल्या). जिला पुढे जाऊन मराठा तलवार असेही संबोधले गेले.

शिवाजी महाराजांना आपल्याला इतकी मोठी ऑर्डर दिली म्हणून स्पेनच्या राजांनी महाराजांची भेट घेऊन महाराजांना एक खास तलवार दिली तीच नाव होतं “जगदंबा तलवार” आणि मराठ्यांना ज्या तलवारी मिळाल्या त्याच नाव “मराठा तलवार”( फिरंगी तलवारी म्हणजेच फिरंगी लोकांकडून आलेल्या तलवारी ज्या परदेशातून आल्या). ह्या तलवारीच्या बळावर मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या.

इंग्रज भारतातून जाताना ते हि तलवार सोबत घेऊन गेले त्यात बऱ्याच हिरेजडित हत्यारांचाही समावेश आहे. हि जगदंबा तलवार सध्या लंडनच्या पॅलेस मध्ये आहे आणि मराठा तलवारी आजही भारतात पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *