सोशिअल मेडीयाने केलं बँक लुटारूंना ट्रोल

भारतीय बँकांना लुटणाऱ्या आणि करोडोंचा घोटाळा करून परदेशी पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी आणि विक्रम कोठारी यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लोक फेसबुक आणि व्हाट्सअँप वर कॉमेडी फोटो शेअर करून संताप व्यक्त करताहेत. सरकार आणि बँका इतक्या सहजतेने अशा लोकांना देश सोडूनच कसे जाऊ देतात असाही सवाल उपस्तित करताहेत.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा केल्याचे प्रकरण सध्या गाजत असतानाच रोटोमॅक या पेनाच्या कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने पाच बँकाना तब्बल ८०० कोटींचा चुना लावल्याचे समोर आले आहे.


Sourse

Sourse

Sourse
विक्रम कोठारीने अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या पाच सरकारी बँकांमधून आठशे कोटींचे कर्ज घेतले होते.

सध्या नीरव मोदी हा परदेशात पळून गेलाय तर याआधी ललित मोदी आणि विजय मल्ल्या हेही परदेशात जाऊन ऐषोआरामात जगताहेत. आणि आपल्या सामान्य माणसानंबद्दल बोलायचं म्हटलं तर कर्जासाठी बँकेत फिरून फिरून नुसती चप्पल झिजते पण लोन मिळत नाही, कित्तेक शेतकरी कर्जफेडता आलं नाही म्हणून आपला जीव देतात..तब्बल तीन वर्ष झाली तरी रुपी बँक घोटाळ्यात तर तब्बल ७ हजार खातेदाराना स्वतःचेच पैसे मिळत नाहीयेत. इतकेच काय तर पॅन कार्ड क्लब हि गेल्या वर्षपासून लोकांना त्यांच्याच रकमेतील फुटकी कवडीही देत नाही. सरकारने यावर गंभीरतेणे विचार करण्याची गरज आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *