“सैराट 2 “बनवण्यावर नागराज मंजुळेने दिले आश्चर्यकारक उत्तर…’हे करायचेच होते तर मी.. ‘

“सैराट” चित्रपट हा नागराज मंजुळेचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. सैराट 2 च्या माध्यमातून त्याचा रिमेक तयार व्हावा अशीही अपेक्षा अनेक रसिकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. मध्यंतरी सैराट २ चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू झाले असल्याचीही अफवा सोशल मीडियावर पसरली होती, असे झाले तर त्या रिमेकचे स्वागतच केले जाईल अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली होती. परंतु नुकतेच नागराज मंजुळे यांनी कलर्स मराठीवरील “एकदम कडक” शोमध्ये हजेरी लावली.


नागराज मंजुळे सोबत रिंकू राजगुरू, आकाश ठोसर सैराट मधील सल्या, तानाजी तर फँड्री मधील ‘जब्या’ या कलाकारांनी हजेरी लावली. त्यात शोचे सूत्रधार जितेंद्र जोशीने अनेक प्रश्न विचारून सगळ्यांना बोलते केले. नागराज मंजुळे यांना “सैराट 2 ” बनवण्याबाबत देखील विचारले. त्यावर नागराज मंजुळे यांनी, असा कुठलाही प्रोजेक्ट मी बनवणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या मी झुंड चित्रपटात व्यस्त आहे.
यासोबत आणखी काही नवे प्रोजेक्ट हाती घेत असल्याच्या विचारात आहे. मला त्याच त्याच गोष्टी पुन्हा कारायला आवडत नसल्याचेही यावेळी संकेत दिले. जर मला तेच तेच लोकांसमोर आणायचे असेल तर चित्रपट बनवण्याऐवजी मी नोकरी करेल. ‘ यावरून नागराज मंजुळे पुढे कधीही सैराटचा रिमेक बनवणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचे तसे संकेतच मिळाल्याने प्रेक्षक काहीसे नाराज होतील यात शंका नाही

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *