“सैराट” फेम रिंकू राजगुरू अचानक इतकी सडपातळ कशी झाली, अमिताभ सोबत झुंड चित्रपटा निमित्त केलं गुपित उघड

सैराट चित्रपटाने अख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धुमाकूळ घातला. सैराट मध्ये दिसरानी भारी भक्कम अभिनेत्री “रिंकू राजगुरू” हिच्या भारदस्त आवाजाने आणि डायलॉगने ह्या चित्रपटाचं रंग रूप खुलून आलं. सैराट नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या तिचा तामिळ चित्रपट “मनसु मल्लिगे” गेल्या वर्षी रिलीज झाला. साऊथ मध्ये रिंकू राजगुरू ह्या तामिळ चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. काही दिवसांत झुंड हा चित्रपट हिंदी भाषेतही येणार आहे. पण सध्या रिंकू एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे.

भारी भक्कम दिसणारी रिंकू राजगुरू झुंड चित्रपटात अचानक इतकी सडपातळ कशी झाली हे जाणण्यासाठी सोशिअल मीडियावर तिला ह्यावर अनेक प्रश्न विचारले गेले. नुकतंच एका हिंदी मॅगझीन साठी दिलेल्या मुलाखतीत तिने ह्याचा उलगडा केला आहे. रिंकू राजगुरू म्हणते” मी जेवणापूर्वी अर्धा तास पोटभर पाणी पिते, त्यामुळे भूक कमी लागते. सडपातळ होण्यासाठी मी रोज सकाळी योगा करते. इतकेच नाही तर ती दिवसातून किमान ३ तास डान्स चा अभ्यास करते ह्यात भारत नाट्यम शिकण्यासाठी मी विशेष मेहनत घेते.
तिच्या चाहत्यांना सडपातळ होण्यासाठी काय सल्ला द्याल असं विचारलं असता ती म्हणाली कि तुम्ही दर एका तासाला किमान एक ग्लास तरी पाणी प्यायलाच हवं. जास्त पाणी प्यायल्याने पोटाचे आजार हि उदभवत नाहीत आणि चेहऱ्यावरील तजेलपणा कायम राहतो, मुख्य गोष्ट म्हणजे पाणी सतत प्यायल्याने तरुणांना चेहऱ्यावर येणारे फोड येत नाहीत. झुंड चित्रपट काम करण्यासाठी ती खूप उत्सुक होती आणि त्यामुळेच तिला हे करणे सहज सोपे झाले. मनात जिद्द असेल तर तुम्हीही हे सहजरित्या करू शकता.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *