२३ एप्रिल रोजी माढा मतदारसंघात मतदान पार पडले. “सैराट ” चित्रपट फेम तानाजी हा माढा तालुक्यातील बेंबळे ह्या गावचा आहे. सैराट चित्रपटातील यशामुळे तो आपल्या आगामी प्रोजेक्ट मध्ये सध्या तो व्यस्त आहे. परंतु असे असले तरी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्याने वेळ काढून बेंबळे येथील मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. तिथे गेल्यावर मतदार यादीत आपले नाव नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याची घोर निराशा झाली. आणि रागारागात तो पुन्हा शूटिंगला निघून आला.

तानाजीने काही महिन्यांपूर्वीच या सर्व बाबींचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता त्याने केली होती. शिवाय तहसील कार्यालयातुन त्यासंदर्भात त्याला फोनही आले होते. यावरून आपले नाव मतदार यादीत असल्याची त्याला खात्री वाटू लागली. एवढे होऊनही त्याचे मतदार यादीत नाव नसल्याचे त्याला सांगण्यात आले.
त्यामुळे नाईलाजास्तव त्याला तसेच माघारी परतावे लागले. यादरम्यान नागराज मंजुळे यांनी देखील कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला होता. माढा येथील जेऊर गावी जाऊन त्यांनी देखील मतदान केले . त्याचे फोटो देखील मीडियावर पाहायला मिळाले. यासोबत सुबोध भावे, श्रुती मराठे, सुयश टिळक, गायत्री दातार यांनी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *