“सैराट” चित्रपटातील आर्चीचे वडील म्हणजेच तात्यासाहेब पाटलांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

“सैराट ” चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातली. चित्रपटातील सर्वच कलाकारांनि आपापल्या भूमिका अगदी चोख बजावलेल्या पाहायला मिळाल्या. चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका म्हणजेच तात्यासाहेब पाटलांची भूमिका सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली होती. त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात… सुरेश विश्वकर्मा हे मूळचे बिड जिल्ह्यातील एका साधारण कुटुंबात वाढले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने अनेक एकांकिका तसेच लोकनाट्य त्यांनी साकारली.

यातच करियर व्हावे म्हणून त्यांनी औरंगाबाद येथिल कॉलेजमध्ये नाट्यशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. टॅक्स फ्री, खंडोबाच लग्न यासारख्या नाटकात विविधांगी भूमिका साकारल्या. पुढे लघुपट ,जाहिराती साकारत असताना छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. कुंकू, अर्धांगिनी, अग्निहोत्र, यु आर अंडर अरेस्ट सारख्या मालिकेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
“महिमा खंडोबाचा ” हा त्यांनी अभिनित केलेला पहिला चित्रपट. गोष्ट छोटी डोंगरएवढी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, रेगे ,फँड्री चित्रपटात कधी पाटील तर कधी इन्स्पेक्टर यांच्या भूमिका निभावल्या.परंतु “सैराट” चित्रपटात सुरेश विश्वकर्मा यांनी साकारलेली विरोधी भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यासाठी त्यांना ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनायकाचा ‘ मानही मिळाला होता. नुकताच रिलीज झालेला “मुळशी पॅटर्न” चित्रपटाचाही ते एक भाग बनले. त्यांचा आगामी चित्रपट “फाईट ” हा देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *