सेक्स वर्कर्सच्या बाबतीत “रेणुका शहाणे”चे वक्तव्य…”माझी आई म्हणायची…” एका अभिनेत्रीने केला तिच्यावरच पलटवार

अभिनेत्री रेणुका शहाणे या ना त्या कारणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाहायला मिळते. तनुश्रीचे मी टु प्रकरण आणि मै भी चौकीदार ह्या चळवळीत तिने केलेले वक्तव्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता रेणुका शहाणे आणखी एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सेक्स वर्कर्सला समाजाने नेहमीच हीन दर्जाची वागणूक दिली आहे. आज कितीतरी पांढरपेशी गुन्हेगार मंत्रालयातच नाही तर या इंडस्ट्रीत मानाच्या स्थानावर कार्यरत आहेत. सेक्स वर्कर्स यांची बाजू मांडत त्यांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते हे तिने आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे.

सेक्स वर्क करणाऱ्यांना खूप कमी वयातच ह्या वाईट गोष्टीच्या शिकार बनतात. त्यांना वेळप्रसंगी शिव्या, मार देखील खावा लागतो. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो आणि शेवटी त्यांना ह्या दलदलीत ढकलले जाते. ह्या दलदलीत त्यांना पाठवणारेही त्यांच्या जवळच्याच व्यक्तीं असतात ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला असतो. एक महिला या नात्याने सेक्स वर्कर्स च्या बाबतीत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. निदान कमीत कमी अपराधी आणि सेक्स वर्कर्स यांना एकाच तराजूत मापणे चुकीचे ठरेल.
रेणुकाच्या ह्या वक्त्याव्यानंतर अभिनेत्री “सुचित्रा कृष्णमूर्ती” हिने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ती म्हणते, ” माझी आई नेहमी म्हणते की पैसाच हे सर्वस्व नसते. आज पैसा अपराधी आणि सेक्स वर्कर्स ह्यांच्या जवळही आहे. केवळ पैसाच सर्वस्व नसून चारित्र्य आणि इमानदारीला देखील तितकेच महत्व आहे.” सुचित्रा ने केलेल्या ह्या पालटवारामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आजवर रेणुकाने अनेक वादग्रस्त विधानात स्वतः उडी घेतली आहे. मी अशा बोलण्याला घाबरत नसल्याचेही याआधी तिने स्पष्ट केले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *