“सूर्यवंशम” चित्रपट अभिनेत्रीबद्दल ९९% लोकांना हे सत्य माहित नाही… सत्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

“सूर्यवंशम” चित्रपट अनेकदा टीव्ही वर दाखवला जातो. अमिताभ बच्चन, सौंदर्या, अनुपम खेर यासारख्या तगडया स्टार कास्ट मुळे चित्रपट चांगलाच यशस्वी झाला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री सौंदर्य अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. अशिक्षित मुलगा आपल्या स्वबळावर कसा यशस्वी होतो याचे उदाहरण अगदि सुरेख दर्शवण्यात आलेले पहायला मिळाले. या चित्रपटाची नायिका सौंदर्र्या हीच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

सौंदर्या हिने तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रात प्रमुख भूमिका साकारून आपले नाव लौकिक केले. १८ जुलै१९७२ साली सौंदर्याचा जन्म झाला. वडील फिल्म रायटर आणि प्रोड्युसर असले तरी तिने आपले वेगळे क्षेत्र निवडले होते. एमबीबीएस असलेल्या सौंदर्याला त्याच क्षेत्रात करिअर करण्याची ईच्छा होती परंतु अभिनयाकडे ती ओघानेच आली असे म्हणायला हरकत नाही. १९९२ साली तिने गंधर्व हा पहिला चित्रपट साकारला. पुढे “द्वीप” हया चित्रपटात प्रमुख भूमिकेसोबत निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. आणि या चित्रपटाला नॅशनल अवॉर्डने नावाजले गेले. विजय क्रांती, टॉप हिरो, अनन्या, अरुंधती, आर्यभट , सुर्यवंशम यासारखे दाक्षिणात्य, हिंदी चित्रपट तिने गाजवले आणि फिल्म फेअरची बेस्ट ऍक्टरेस साठीची अनेक नामांकने तिने आपल्या पदरात पाडली.
२००३ साली सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जी एस रघु सोबत लग्नाच्या गाठीत अडकली. सामाजिक बांधिलकी जपत तिने अनाथ मुलांसाठी तीन शाळा देखील उभारल्या आहेत.२००४ साली तिने राजकिय क्षेत्रात उडी घेतली. भाजपच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आंध्रप्रदेश येथे जावे लागले . १७ एप्रिल २००४ साली बंगलोर येथून विमानाने जात असताना विमानाचा स्फोट झाला आणि यातच तिचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले. या अपघातात तिचा भाऊ अमरनाथ हा देखील मृत्युमुखी पडला. असेही सांगण्यात येते की, सौंदर्या यावेळी पाच महिन्याची गरोदर होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *