sushant rajput pic

सुशांतला जाऊन एक आठवडा उलटला असला तरी आजही त्याच्या आठवणी ताज्या करत अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत. एम एस धोनी चित्रपटात सुशांतची बहीण साकारणारी अभिनेत्री भूमिका चावला हिनेही ‘ सगळं सिक्रेट तुझ्यासोबत निघून गेलं…’ अशी गूढ भावना व्यक्त केली आहे. सुशांत सिंह राजपुतच्या जाण्याने अनेक कलाकारांनी आपल्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यातच सुशांत आणि अंकिता यांच्या ऑनस्क्रीन मुलीनेही त्याच्याप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

sushant singh rajput
sushant singh rajput

पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिता आणि सुशांतने एकत्रित काम केले होते. मालिकेत मृणालिनी त्यागी या अभिनेत्रीने त्या दोघांच्या मुलीची भूमिका साकारली होती. एकत्रित काम करत असताना एकमेकांच्या आवडीनिवडी सहकलाकारांना चांगल्या परिचित असतात. सुशांत हा शाहरुख खानचा खूप मोठा फॅन असल्याचे तीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले. सुशांतने अनेक मोठी स्वप्नं पाहिली होती. त्याचे स्वप्न होते की, एक दिवस मीही शाहरुख खानप्रमाणे स्वतःचा मन्नत बांधेन आणि बॉलीवूडचा पुढचा बादशहा बनवून दाखवेल. सुशांत शाहरुख खान प्रमाणे स्वतःला SSR संबोधत असे आणि त्याची सही पोज करत असे. तो नेहमी म्हणत असे की बॉलिवूडचा पुढचा बादशहा मी असेल. डोळ्यात मोठमोठी स्वप्ने साठवून ठेवणाऱ्या सुशांतने आत्महत्येचा निर्णय घेऊन आपले आयुष्य संपवले. मुळात तो खूपच हुशार, बुध्दीवान आणि आत्मविश्वासू व्यक्ती होता. याच कारणामुळे तो या क्षेत्रात यशस्वी झाला होता. त्याच्या अशा जाण्याने खूपच दुःख झाले, सुशांत आणि आत्महत्या या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या कधीच एकत्र प्रवास करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *