sushant ray wife

“शांतीप्रिया” ही अक्षय कुमारची पहिली हिरोईन म्हणूनही ओळखली जाते. १९९१ सालच्या ‘सौगंध’ या बॉलिवूड चित्रपटातून अक्षय कुमारने पदार्पण केले होते त्यात अक्षय सोबत शांतीप्रियादेखील झळकली होती. मुळात शांतीप्रिया ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून नावारूपास आली होती. सौंगंध चित्रपटाव्यतिरिक्त फुल और अंगार, विरता, मेहरबान, इक्के पे इक्का अशा आणखी काही बॉलिवूड चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली. दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया ही शांतीप्रियाची मोठी बहीण.

akshay kumar and shantipriya
akshay kumar and shantipriya

१९९९ साली शांतीप्रिया ही अभिनेता सुशांत रे (चित्रपटातील नावामुळे सुशांत रे हा सिद्धार्थ रे या नावानेही ओळखला जातो) सोबत विवाहबंधनात अडकली. सुशांत रे हा मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेता. जैत रे जैत,अशी ही बनवाबनवी, चानी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, वंश, बाजीगर अशा गाजलेल्या चित्रपटातून सुशांतने दमदार भूमिका साकारल्या होत्या. परंतु २००४ सालीच सुशांतने वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याची ‘शुभम आणि शीश्या’ ही दोन्ही मुलं त्याच्याच पावलावर पाऊल टाकत कलाक्षेत्राशी निगडीत असलेली पाहायला मिळतात. “बिग बॉस” हा रिऍलिटी शो नेहमीच एक कुतूहलाचा विषय म्हणून बनत गेला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच या शोमधून आपल्या आवडत्या कलाकाराची वागणूक कशी असते हे प्रत्यक्षात पाहायला मिळत असल्याने शोच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असलेली पाहायला मिळते. गेल्यावेळी बिग बॉसचा १३ वा सिजन सिद्धार्थ शुक्लामुळे खूपच गाजला होता. त्या सिजनचा तो विनरही बनला होता. आता पुन्हा एकदा चाहत्यांना बिग बॉसच्या १४ व्या सिजनची ओढ लागलेली पाहायला मिळत आहे. लवकरच हा सिजन सुरू होणार असून सिजनमध्ये सहभागी होणाऱ्या एका कलाकाराचे नाव आता कन्फर्म असल्याचे सांगण्यात आले आहे.

sushant and shantipriya
sushant and shantipriya

अधिकृतरीत्या सहभागी होणाऱ्या कंटेस्टंटची नावे जाहीर झाली नसली तरी पहिली कंटेस्टंट म्हणून अभिनेत्री “शांतीप्रिया” हिच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे . स्वतः शांतीप्रियाने देखील या माहितीची दखल घेत म्हटले आहे की, ‘ बिग बॉस हा माझा खुपच फेव्हरेट रिऍलिटी शो आहे. मला यात सहभागी व्हायला निश्चितच आवडेल.’ अशी प्रतिक्रिया दिली. बिग बॉसच्या १४ व्या सिजनसाठी शांतीप्रिया एक कंटेस्टंट म्हणून सहभागी होत आहे. त्यानिमित्ताने शांतीप्रिया सुशांतच्या आठवणींना निश्चितच उजाळा देणार यात शंका नाही त्यामुळे आपल्याला सुशांत आणि शांतीप्रिय यांचे फोटोही पाहायला मिळतील. याबाबतीत ती असेही म्हणाली की बिग बॉसच्या घरात गेल्यावर ‘वेळ पडली तर मी दुर्गाही बनून दाखवेल’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सर्व कंटेस्टंटची कोरोना टेस्ट करूच त्यांना घरात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी बिग बॉसचे घर जंगल थिमनुसार सजवले जाणार असून घरातील सर्वच वस्तू या सॅनिटायझ करण्यात येणार आहेत. सिजनचा प्रोमो सलमान खान आपल्या पनवेल येथील फार्महाऊस मधूनच करणार असून विकेंड वॉर एपिसोड साठी शनिवारी त्याला शुटिंगसाठी यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *