“सुलभा देशपांडे ” यांनी सून आहे हि सुंदर अभिनेत्री.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल

सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. १९३२ साली त्यांचा मुंबईत जन्म झाला. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यानि गाजवल्या. दूरदर्शन वरील अनेक मालिका, हिंदी मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके त्यांनी साकारली. ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या ह्यावरूनच त्यांचा हिंदी मराठीतील दांडगा अनुभव प्रत्ययास येईल.

रंगभूमीमुळेच सुलभाताईची आणि अरविंद देशपांडे ह्यांची ओळख झाली. जवळपास दोन वर्षे त्यांनी प्रेमाच्या आणाभाका गिरवल्या आणि रंगभूमी सोडणार नाही ह्या वचनावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर “निनादचा” जन्म झाला मग मात्र सुलभा ताई रंगभूमिपासून जवळपास ३ते ४ वर्षे दूर राहिल्या.अरविंद देशपांडे हे कधीच वचन पाळत नसत. दर वाढदिवसाच्या दिवशी “मी तुझं देणं लागतो.एक सिल्कची साडी” अशी एक चिठ्ठी त्यांच्याकडून सुलभाताईंना मिळत असे. अशा चार पाच चिटठ्या एकत्रित जमवून त्या अरविंद रावांकडे सुपूर्त केल्या आणि एक गोदरेजचे कपाट आणायला सांगितले असल्याची आठवण एका मुलाखतीत त्यांनी करून दिली.
मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री “अदिती देशपांडे” ही सुलभा देशपांडे ह्यांची सून आहेत.” पेहरेदार पिया की” या हिंदी मालिकेत तिने महत्वाची भूमिका बजावली आहे. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया ह्या तिने अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
१९६७ साली “शांतता कोर्ट चालू आहे” हे सुलभा ताईंनी अभिनित केलेले नाटक तुफान गाजले . त्यात त्यांनी साकारलेली लीला बेणारेची भूमिका अजरामर झाली. हाऊसफुल चे बोर्ड लावलेल्या ह्या नाटकाचे तब्बल १३ भारतीय भाषेत अनुवाद केले गेले.

दोघांनीही आपली नोकरी सोडून संपूर्ण वेळ रंगभूमीला अर्पण केला. १९७९ साली “चंद्रशाला” ची निर्मिती करून सुल्भताईंनी बालनाट्य विभाग सुरू केला. अरविंद देशपांडे ह्यांनी बहुतेक चित्रपटात विरोधी भूमिका साकारल्या. बाळाचे बाप ब्रह्मचारी , चाणी, शापित सारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. ” प्रेमाच्या गावा जावे ” ह्या नाटकाचे प्रयोग चालू होते याचदरम्यान ३ जानेवारी १९८७ रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सिने सृष्टीत शोककळा पसरली. “अविष्कार” चे संस्थापक म्हणून अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही महोत्सव आयोजित केले जातात. त्यांच्या मृत्यूनंतर सुलभाताई डगमगल्या नाहीत उलट त्यांच्या पाठी रंगभूमीची अविरत सेवा अशीच चालू ठेवण्याचे व्रत त्यांनी निभावले. मिसेस तेंडुलकर, विजेता, दुनिया, खून भरी मांग, जादू का शंख, कस्तुरी, अल्पविराम, अस्मिता सारख्या मालिका चित्रपट साकारत तब्बल ३४ पेक्षा जास्त जाहिरातीत काम करून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ब्रँड ऍम्ब्यासिडर बनल्या. अखेर ४ जून २०१६ रोजी सुलभाताई देशपांडे यांचे निधन झाले आणि एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *