अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या यांनी एकत्रित साकारलला “सुर्यवंशम” हा चित्रपट बहुतेक सर्वांनीच पहिला असावा. हा चित्रपट अनेकदा सेट मॅक्स या वाहिनीवर दाखवण्यात येतो. त्याचमुळे १९९९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कित्येकांच्या चांगलाच परिचयाचा बनला आहे. मुळात हा चित्रपट यशस्वी होण्यामागे त्यातील मुख्य कलाकारांसोबतच त्याचे कथानकदेखील गृहीत धरले जाते. भानू प्रतापसिंग, हिरा ठाकूर, राधा या मुख्य पात्रासोबतच हिरा ठाकुरच्या मुलाची म्हणजेच ज्युनिअर भानू प्रतापसिंगची भूमिका देखील विशेष लक्षवेधी ठरली होती. या बालकलाकाराविषयी अधिक जाणून घेऊयात….

सुर्यवंशम चित्रपटात ज्युनिअर भानू प्रताप सिंग ही भूमिका साकारली होती ‘आनंद वर्धन’ या कलाकाराने. आनंद वर्धन एक बालकलाकार म्हणून चांगलाच नावारूपास आला होता मात्र सध्या तो या क्षेत्रापासून काहीसा दुरावलेला दिसतो. आनंद वर्धन याचे आजोबा पी बी श्रीनिवास हे एक प्रसिद्ध गायक होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोकणी, कन्नड, हिंदी, तुलू, तमिळ अशा विविध भाषेतील गाणी गायली आहेत. त्यांची अशी ईच्छा होती की आपल्या नातवाने अभिनय क्षेत्रात जावे. त्याचमुळे आनंद वर्धन अवघ्या ४ वर्षाचा असताना रामायनम या चित्रपटात झळकला. यासोबतच त्याने आणखी काही दाक्षिणात्य चित्रपटातून बालकलाकार म्हणून भूमिका बजावल्या. परंतु सुर्यवंशम चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. जगपती बाबू, वेंकटेश या कलाकारांसोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. पुढे जाऊन आनंदने आपले शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले. हैद्राबाद येथील सिएमआर कॉलेजमधून त्याने कम्प्युटर सायन्सची पदवी मिळवली आहे. तो सध्या स्वतःच्या जीम मध्ये जीम इन्स्ट्रटर म्हणूनही काम करतो आनंद सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून एका चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *