“सुबोध भावे” ची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी…कॅनडात गेलेल्या मंजिरीला पाहण्यासाठी रात्ररात्र जागून ..

अभिनेता सुबोध भावे या वर्षी आपल्या एकामागून एक येऊ घातलेल्या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे. मोठ्या पडद्यासोबतच झी वाहिनीच्या “तुला पाहते रे” मालिकेचीदेखील सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे हे वर्ष सुबोध साठी अगदी खासच म्हणावे लागेल. सुरवातीला मालिकेवर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला पण जसजशी मालिका पुढे जात राहिली तस तशी मालिका रंजक झाल्याने ती लोकांना आवडू लागली, अत्यंत वेगळा विषय यशस्वीरित्या हाताळ्याचे पाहायला मिळतेय. हे झालं मालिकेचं पण खऱ्या जीवनातली सुबोध भावेंची लव्ह स्टोरी ह्याहुनही इंटरेस्टिंग आहे.

सुबोध भावे आणि मंजिरी यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंगच आहे. सुबोध आणि मंजिरी दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत होते. परंतु एका नाटकादरम्यान त्या दोघांची नाट्यकला मंदिरात भेट घडून आली. पाहताक्षणी सुबोध मंजिरीच्या प्रेमात पडला. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत शिकत होता. मंजिरीला पाहिल्यावर सुबोधने
” शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट…” अशा आशयाचा मजकूर लिहून त्याने तिला उत्तर विचारले. यावर मंजिरी म्हणाली की मी बालगंधर्व पुलावर आले तर होकार समज नाही आले तर नाही समज. परंतु त्या दिवशी ती तिथे आली आणि तिने आपला होकार कळवला.यानंतर जवळपास दोन वर्षे ते एकमेकांना भेटू लागले. सुबोधने त्याच्या घरच्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली परंतु आधी शिक्षणाला प्राधान्य देण्याचा सल्ला त्याच्या घरच्यांनी दिला.

पुढे मंजिरी आपल्या कुटुंबासोबत कॅनडाला शिफ्ट झाली. दोघेही एकमेकांना पत्रे पाठवू लागली. तिची एक झलक पाहायला मिळावि यासाठी सुबोध कॅनडात चाललेल्या क्रिकेटच्या मॅचेस रात्र रात्र जागून पाहू लागला. कॅनडातून परतल्यावर जवळपास पाच वर्षांच्या विरहानंतर ते पुण्यात पुन्हा एकमेकांना भेटू लागले. यादरम्यान दोघांनीही एकाच कंपनीत नोकरीही पत्करली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.गेली २५ वर्षाहून अधिक काळ ते दोघे एकमेकांच्यासोबत आहेत. संसाराच्या वाटेवर तिने दिलेली साथ ही खूप मोलाची असल्याचे तो सांगतो. मल्हार आणि कान्हा या दोन मुलांपैकी मोठा मुलगा मल्हारने “माझा अगडबम” चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *