सुबोध भावेने शेअर केला या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबतचा फोटो…एकेकाळी खूप फेमस असायच्या आज कोणी ओळखतही नाही

अभिनेता सुबोध भावे सध्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकातून काम करत आहे. याचदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सुबोधचे हे नाटक पाहण्यासाठी तिथे हजर होत्या त्यावेळी सुबोधने त्यांच्यासोबत फोटो काढून आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले. हे फोटोपाहुन या अभिनेत्रीचे दर्शन झाल्याचे समाधान सेलिब्रिटींनी व्यक्त कसले तर कित्येकांनी सुबोधचे याबाबत आभारदेखील मानले. ह्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत “दया डोंगरे “. ललिता पवार यांच्यानंतर मराठीतील खाष्ट सासू म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या म्हणजे दया डोंगरे होय. ११ मार्च १९४० रोजी दया डोंगरे यांचा जन्म झाला. लहानपणी दया डोंगरे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

आकाशवाणीच्या धारवाड येथील उदघाटनात पहिल्यांदा गाणे गायची संधी त्यांना अवघ्या १२ व्या वर्षी मिळाली होती. त्यांच्या आई यमुताई मोडक या रंगभूमीवरील जाणत्या कलाकार तर प्रसिद्ध अभिनेत्री शांता मोडक या त्यांच्या आत्या. परंतु आपल्याला काम मिळावे म्हणून त्यांनी या नावाचा कधीच वापर केला नाही. महाविद्यालयात असताना अनेक नाट्यस्पर्धा त्यांनी गाजवल्या. दूरदर्शन वरील त्यांनी निवेदन केलेली ‘गजरा’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. याच मालिकेमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. याच साठी केला होता अट्टाहास, इडा पीडा टळो नाटकांसोबत उंबरठा, नवरी मिळे नवऱ्याला यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. सचिन पिळगावकर च्या मायबाप चित्रपटात खट्याळ सासू साकारण्याची संधी त्यांना मिळाली. इथूनच त्यांच्या अभिनयाला दाद मिळत गेली. यानंतर अशाच धाटणीच्या भूमिका गाजवून मराठीतील खाष्ट, दृष्ट आणि कजाग सासू उदयास आली.
१९९० साली “चार दिवस सासूचे” हा अखेरचा चित्रपट त्यांनी साकारला. अँड्रॉपीयॉन या डोळ्यांच्या आजारामुळे त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्वीकारली. आज इतके वय झाले तरी त्या संगीताचा रियाज करायला विसरत नाहीत. शिवाय वेगवेगळी नाटकं पाहायला देखील त्या आवर्जून जातात. एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडला तर त्याचा फोन नंबर मिळवून त्याला शाबासकी देतात. काही वर्षपूर्वी दया डोंगरे यांचे पती शरद डोंगरे यांचे आकस्मिक निधन झाले. यातून स्वतःला सावरत त्या आता आपली आवड जोपासताना दिसत आहेत. त्यांची मोठी मुलगी संगीता ही लग्न होऊन मुंबईतील त्यांच्या घराजवळच राहते. तर धाकटी मुलगी अमृता ही बंगलोरला स्थायिक आहे. दोन मुली ,जावी, नातवंड असा परिवार त्यांना भेटायला नेहमी येतो. नुकताच अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *