सुबोधने भावे यांनी पत्नी मंजिरीला स्वतःच्या रक्ताने लिहिले होते पत्र…कारण वाचून थक्क व्हाल

अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी अगदी शालेय जीवनात असल्यापासून एकमेकांना ओळखतात. पुण्यातील नाट्यमंदिरात एका नाटकादरम्यान मंजिरी आणि सुबोध यांची ओळख झाली होती. यावेळी सुबोध दहावीत तर मंजिरी आठवीत शिकत होती. मंजिरीला पाहताक्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता. त्याने पत्र लिहून तिला प्रपोज केले होते. यावर मंजिरीनेही होकार कळवला होता. यानंतर जवळपास दोन वर्षे हे दोघेही एकमेकांना भेटू लागले होते.

एकदा सुबोध अकरावीत असताना त्याच्या मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेला होता. तिथे बसून तो आपल्या मित्रांसोबत सिगारेट ओढत बसला होता. त्याच्या आसपास दोन चार जण इकडून तिकडे फिरत होते. वर पाहिल्यावर त्याला मंजिरी दिसली. सुबोध सिगारेट ओढताना पाहून मंजिरीला राग आला. मग मंजिरीची समजूत काढत तो तिच्या मागोमाग गेला. परंतु काही केल्या मंजिरीने त्याला माफ केले नाही. यावर सुबोधला पश्चाताप तर झालाच पण यापुढे कधीही सिगारेटला हात लावणार नसल्याचा निर्णय घेत आपल्याच रक्ताने त्याने मंजिरीला एक पत्र लिहिले. आजही याच्या खुणा त्याच्या हातावर पाहायला मिळतील . कलर्स मराठीवरील ” नवरा असावा तर असा ” या शो दरम्यान हर्षदा खानविलकर हिच्यासोबत गप्पा मारताना सुबोधने हा किस्सा तिला सांगितला. याच शोमध्ये सुबोध त्याची पत्नी मंजिरीसोबत आलेला पाहायला मिळाला. याच भागात अभिनेता प्रसाद ओक ने देखील सपत्नीक हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *