” सुनील गावस्कर ” एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून नावाजलेले नाव. टेस्ट क्रिकेट मधील त्याचे रेकॉर्ड सर्वपरिचित आहेत. सचिन तेंडुलकर च्या आधी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा मान त्यांनी पटकावला होता. क्रिकेट मधील ‘लिटल मास्टर’ तसेच ‘सनी ‘म्हणूनही ते ओळखले जातात. सनी डेज ह्या पुस्तकात त्यांची इंटरेस्टिंग प्रेम कहाणी लिहली गेली आहे ती जाणून घेऊयात.

सुनील गावस्कर यांचा जन्म १० जुलै १९४९ साली मराठी कुटुंबात झाला. आईचे नाव मीनल गावस्कर तर वडिलांचे नाव मनोहर गावस्कर. क्रिकेट खेळासोबतच त्यांनी मराठी चित्रपटात देखील अभिनय साकारला आहे. मराठी चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्या पत्नीने त्यांना प्रोत्साहित केलेलं होत.

१९८० साली “सावली प्रेमाची” या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेता अरुण सरनाईक, श्रीराम लागू यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदी सिने सृष्टीत देखील पाऊल टाकले आहे. १९८८ सालच्या “मालामाल” या नसिरुद्दीन शहा, पूनम धीलोन यांच्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली.

सुनील गावस्कर यांनी २३ सप्टेंबर १९७४ साली मार्शनील हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. कानपुर येथील लेदर इंडस्ट्रीयलिस्ट मल्होत्रा यांची ती मुलगी आहे. सुनील आणि मार्शनील यांची एका मॅच दरम्यान भेट घडून आली.

मार्शनील ह्या दिल्लीतील श्रीराम कॉलेजमध्ये शिकत होत्या. एकदा मॅच पाहण्यासाठी त्या स्टेडियम मध्ये गेल्या. मॅच मधील ब्रेकच्या दरम्यान सुनील गावस्कर स्टुडंट गॅलरीत गेले. त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी मार्शनील तिथे गेल्या.

तेव्हा सुनील गावस्कर यांनी तिला नोटीस केले, तिच्याबाबतची सर्व माहिती गोळा केली. पुढे पत्र पाठवून तिला कानपुर येथील मॅच दरम्यान ते तिला भेटायला गेले, आणि तिथेच तिला सुनील गावस्कर यांनी फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोज केले. अनेक दिवसांच्या भेटीनंतर त्यांनी मार्शनील सोबत विवाह केला.

सुनील आणि मार्शनील यांना रोहन नावाचा मुलगा आहे. रोहन सुद्धा क्रिकेट जगतात नाव कमावण्यासाठी आला पण त्याला म्हणावं तस यश मिळालं नाही. पण रणजी सामन्यांत त्याच हटके अंदाज सर्वानाच खुश करून गेला. रोहनने स्वाती मानकर हिच्यासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगीही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *