‘सुकन्या समृद्धी योजना’ ह्या योजनेचे फायदे जाणून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचवा

कमीतकमी गुंतवणुकीत अधिकाधिक लाभ मिळावा म्हणून लोक आपला पैसा वेगवेगळ्या मार्गे गुंतवणूक करताना दिसतात.परंतु या गुंतवलेल्या पैशाचा खात्रीशीर परतावा मिळेलच याबाबत शाश्वती देता येत नाही. म्हणूनच सामान्य नागरिक शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या काही योजनांचा लाभ घेताना दिसतात. एक सोईस्कर मार्ग म्हणून नागरिक भारतीय पोस्ट बचत योजनाचा अवलंब स्वीकारतात. पाच प्रकारे या योजना राबवल्या जातात. बचत खाते, आर डी खाते, एफ डी खाते, एम आई एस खाते आणि सुकन्या समृद्धी योजना . या सर्व योजनाचा लाभ ४% पासून ते ८.१% पर्यंत देण्यात येतो तसेच आपल्या गुंतवणुकीवर परतावाही चांगला मिळत असल्याने याचा फायदा घेणे सोईस्कर ठरते.या सर्व खात्यात तुम्हाला किती फायदा मिळतो ते लक्षात येईल…

१. पोस्ट ऑफिस बचत खाते- हे खाते पोस्ट ऑफिसमध्येच खोलवे लागते. व्याजाच्या १०,००० रकमेपर्यंत तुम्हाला कर आकारला जात नसला तरी यानंतरच्या रकमेवर कर आकारण्यात येतो. तुम्ही गुंतवणुक केलेल्या रकमेसाठी ४% व्याज म्हणून परतावा मिळतो.
२. पोस्ट ऑफिस आरडी- ५ वर्षापर्यंत याची मर्यादा ठेवण्यात येते. कमीतकमी १०,००० रु पासून आरडी सुरू करता येते . जास्तीतजास्त कितीही रक्कम तुम्ही यात जमा करू शकता. नियमित रक्कम जमा करून या रकमेवर ६.९% व्याज तुम्हाला देण्यात येते. गरज असल्यास एका वर्षानंतर व्याजाची निम्मी रक्कम काढण्यास तुम्हाला परवानगी देण्यात येते.

३. पोस्ट ऑफिस एम आई एस – कमीतकमी १५०० पासून मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम असे हे खाते खोलले जाते. जास्तीतजास्त ४.५ लाखापर्यंत याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिवाय तुमचे जॉईंट खाते असेल तर ही रक्कम ९ लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे. तुमच्या रकमेवर तुम्हाला ७.३% एवढे व्याज दर दिला जातो. व्याजाची रक्कम बचत खात्यात जमा केल्याने ही रक्कम तुम्ही कधीही काढू शकता.
४. पोस्ट ऑफिस एफडी- कमीतकमी २०० रु भरून तुम्ही हे खाते उघडू शकता. तुमच्या रकमेवर वर्षाला व्याज मिळते. पहिल्या वर्षी ६.६% तर दुसऱ्या वर्षी ६.७% आणि हे व्याज वाढत जाऊन पाचव्या वर्षी ७.४% इतका परतावा मिळतो. यासोबतच तुम्हाला करावरदेखील सूट देण्यात येते.

५. सुकन्या समृद्धी योजना- आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी एक उपाययोजना म्हणून शासनातर्फे ही योजना राबविण्यात आली आहे. सुरुवातीला याची रक्कम १००० रु एवढी करण्यात आली होती. परंतु आता हीच रक्कम २५० पासून सुरू करण्यात आली आहे. मुलींच्याच नावे हे खाते खोलवे लागत असल्याने याचा फायदाही तिला होणार आहे. या खात्यात तुम्ही जास्तीजास्त १.५ लाखापर्यंतची रक्कम जमा करू शकता. ही रक्कम तुम्ही महिन्यात, वर्षात कितीही वेळा टाकू शकता. वरील सर्व योजनापेक्षा या योजनेचा परतावाही अधिक दिला जातो. तुमच्या रकमेवर ८.१% इतका परतावा मिळत असल्याने ही सर्वात मोठा फायदा मिळवुन देणारी योजना मानली जाते.
तुम्हाला हि रक्कम फक्त १४ वर्ष भरायची आहे. म्हणजे जर तुम्ही वर्षाला १००० रु. प्रमाणे १४ वर्ष हि रक्कम भारत असाल तर १४ वर्षापर्यंत तुम्ही त्या खात्यात १४००० रु. भराल त्यानंतर तुम्हाला त्यात एकही पैसे भरायचा नाही.(समजा तुमच्या मुलीचे वय १ वर्ष आहे. त्याच्या खात्यात तुम्ही १००० रु. पती वर्ष याप्रमाणे १४ व्या वर्षी १४००० जमा होतील पुढील ७ वर्ष तुम्हाला त्या खात्यात एकही रुपया भरायची गरज नाही. मुलगी जेव्हा २१ वर्षाची होईल तेव्हा तिला ४६,८२१ रु. मिळतील. ह्याच प्रमाणे जर तुम्ही ५००० रु. प्रतिवर्ष प्रमाणे १४ वर्ष भराल तर ५००० x १४ = ७०,००० रु. जमा होतील आणि २१ व्या वर्षी मिळणारी रक्कम हि २,३४,१०७ रु. इतकी असेल. हि योजना आणि ह्याची अधिक माहिती तुम्हाला तुमच्या नजीकच्या शासकीय बँकेत सुरु करता येईल.

ह्या व्यतिरिक्त अश्या बऱ्याच योजना मुल आणि मुली अश्या दोन्ही करता आहेत. ज्यामध्ये जर तुम्ही काही वर्ष रक्कम भरली आणि तुमचा दुर्दैवी अंत झाला (तुम्ही मृत्यू पावला) तर पुढील रक्कम भरायची गरज नसते. ती रक्कम आपल्या मुलांच्या खात्यात आपोआप भरली जाते आणि पॉलिसी संपल्यावर २१ व्या वर्षी संपूर्ण मिळणारी रक्कम आपल्या मुलांना मिळते.
त्यामुळे पैसे गुंतवण्याची कुठलीही घाई न करता आधी समजून घ्या, विचार करा आणि मगच पोलिसी काढा. पोलिसी आणि योजना खूप आहेत पण कोणती योजना आणि किती गुंतवणूक करायची याचा विचार शांत डोक्याने करा.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *