स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सिद्दी खैर्यंतची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या कलाकारावीषयी अधिक जाणून घेऊयात…ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “विश्वजित फडते “. विश्वजीत फडते यांनी साकारलेला सिद्दी खैर्यत साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. खुनशी नजर, आवाजातील करारे पणा , बोलण्याची लकब यासर्व गुणसंपन्न अभिनयाने प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकली आहेत. खरं तर मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका या अगदी चोख बजावलेल्या पाहायला मिळतात हेच या मालिकेच्या यशामागचे खरे गमक आहे.
विश्वजित फडते हे रंगभूमीवरील जाणते कलाकर, ते मूळचे गोव्याचे . याआधी त्यांनी “प्रेम ऍट फर्स्ट साईट ” हा गोवा भाषिक चित्रपट साकारला होता. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती कलर्स मराठीवरील “आपला राजा जाणता राजा” मधील अफजलखान च्या भूमिकेमुळे. या लोककलेचे दिग्दर्शनही कार्तिक केंढे यांनीच सांभाळले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली होती. यासोबतच त्यांनी झी मराठीवरील “जय मल्हार” या लोकप्रिय मालिकेतही महत्वाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या वाट्याला अनेक विविधांगी भूमिका आल्या ज्यात त्यांनी कंस मामा देखील साकारलेला पाहायला मिळाला. रंगभूमी, मालिका मधील त्यांच्या वाट्याला विरोधी भूमिका जरी आल्या असल्या तरी त्यांनी त्या अगदी लीलया पार पाडलेल्या पाहायला मिळतात. अशाच धाटणीची त्यांची सिद्दी खैर्यतची भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरत आहे. विश्वजित फडते यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…