२०१८ साचा सर्वात तगडा चित्रपट म्हणून “सिंबा” कडे पाहिलं जातंय. कालच मोठया धुमधडाक्यात चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट पाहणाऱ्यांनी तो एक उत्कृष्ठ चित्रपट असून चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेला आणि डायलॉगला चांगलीच पसंती दर्शवलीय. रोहित शेट्टी यांनी डायरेक्शन केलेल्या सिंबा चित्रपटात तब्बल ८० कोटींचं बजेट लागलेय. तब्बल ३००० स्क्रीन वर चित्रपट देशभरात दाखवला गेलाय, पहिल्याच दिवसाचं कलेक्शन २० कोटी होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. पण ह्या चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालंय पाहुयात..

अभिनेता रणवीर सिंग याने जबरदस्त ऍक्शन सोबत चांगली कॉमेडी केलीली पाहायला मिळतेय. चित्रपटात सर्वात दांडगा अभिनय त्यांनीच केलेला पाहायला मिळतोय. चित्रपटासाठी रणवीर सिंग याने तब्बल ११ कोटी रुपये इतक तगड मानधन घेतलंय. पण चित्रपटाची नवोदित अभिनेत्री सारा अली खान हिला मात्र ह्या चित्रपटासाठी फक्त ५० लाख रुपये इतकंच मानधन मिळालय. सारा अली खान हिला कमी मानधन मिळालं तरी सिंबा मुले ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आलीय.
पण दोन दिग्गज कलाकार असेही आहेत ज्यांनी ह्या चित्रपटात आपला छोटासा रोल निभावला आणि तेही एकही पैसे न घेता. हो रोहित शेट्टी यांचे चित्रपट गाजवणारा “अजय देवगण” आणि रोहित शेट्टी यांच्या आगामी चित्रपट करणारा “अक्षय कुमार” यांनी ह्यासाठी एकही रुपया न घेतल्याची बातमी आहे. शेवटी पैसे काय कोण्ही कमावतो पण ह्या चित्रपटामुळे त्याच नाव आणि प्रसिद्धीत चांगलीच भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *