“सायना नेहवाल” या प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअरसोबत अडकणार विवाहबंधनात… गेली दहा वर्षांपासून दोघे करत होते डेट

“सायना नेहवाल “ही भारतीय प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअर म्हणून ओळखली जाते. नुकताच तिच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. सायना नेहवालच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनेही यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे सांगितले जाते. परंतु सायना नेहवाल सध्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सायना नेहवाल विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी हाती आली आहे.

सायना आणि प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअर पारूपल्ली कश्यप दोघेही १६ डिसेंम्बर २०१८ रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली दहा वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.सायना नेहवाल पुलेला गोपीचंद यांना आपला गुरू मानते तर पी कश्यप देखील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीतुन ट्रेन झाला आहे. २०१२ सालच्या त्याच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे “अर्जुन पुरस्काराने” गौरविण्यात आले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *