साध्याभोळ्या ‘मोहन’ची पत्नी आहे हि सुंदर मराठमोळी नृत्यांगना…

जागो मोहन प्यारे हि झी वाहिनीवरील मालिका सध्या चांगलीच गाजतेय. सध्याभोळ्या मोहनच्या आयुष्यात त्याला त्रास देणारे त्याच्या घरातील त्याची पत्नी, सासू तसेच चाळीतील लोक आणि मग त्याची साथ देणारी परी ‘भानुमती’ यांच्या चांगल्या जुळणीमुळे मालिका पाहायला गम्मत येते. मालिका सुरूहोऊन जवळपास वर्ष होत आलं पण मालिकेतील पात्रे ज्याप्रकारे मालिकेत धम्मल घडून आणतात त्यामुळे मालिका पाहायला तितकाच उत्साह येतो.

विद्याधर पाठारे आणि मनिषा दळवी हे या मालिकेचे प्रोड्युसर असून ओंकार डिंगोरे हे मालिकेचं डायरेक्टर तसेच लिखाण केले आहे. मालिकेतील पत्रे तर सर्वांची ओळखीची आहेतच पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात. मालिकेत मोहनची भूमिका साकारणाऱ्या अतुल परचुरे यांच्या बद्दल जाणून घेऊयात.

अतुल परचुरे यांचा जन्म नोव्हेंबर ३०, (वर्ष माहीत नाही) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ आणि ‘बडे दूरसे आय हें’ या त्यांच्या खूप गाजलेल्या हिंदी मालिका. कॉमेडी नाईट विथ कपिल मधेही ते पाहायला मिळाले. प्रख्यात नृत्यदिग्दशिका सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत.

सोनिया परचुरे यांचा जन्म २० डिसेंबर १९७३ साली ठाणे मुंबई येथे झाला. त्यांच शिक्षण ठाण्याच्या सरस्वती शाळेतून झालं. आणि तेथूनच कॉलेजचं शिक्षणही पूर्ण केलं. शिक्षणाबरोबरच त्या नृत्यातही पारंगत झाल्या. त्यांनी पारंपरिक नृत्याचे अनेक कार्यक्रमही केले आहेत.

दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ‘गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते. अतुल परचुरे याना सखील परचुरे नावाची मुलगी आहे. सध्या ते तिघेही मुंबई स्थायिक आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *