सलमान खान बनियन घालून फिरत होता या अभिनेत्रीच्या लग्नात…जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री

सलमान खान त्याच्या बहुतेक चित्रपटात शर्टलेस झाल्याचे पाहिले आहे परंतु चक्क एका लग्नात तो बनियन घालून फिरत असल्याचे दिसून आले असल्याने त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे निश्चितच हे लग्न त्याच्या खूप जवळच्या व्यक्तीचे असेल असा तर्क हे फोटो पाहून वाटतो. खरं तर हे व्हायरल होणारे फोटो खूप वर्षांपूर्वीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री बिना काक यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या लेकीच्या लग्नाचे हे फोटो शेअर केले त्यावरून सोशल मीडियावर सलमान खानचे हे शर्टलेस फोटो व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री बिना काक यांची मुलगी अमृता काक हिच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यात सलमान खानने अगदी घरच्याच सदस्याप्रमाणे हजेरी लावली होती. सलमान खान बिना काक यांना आपली आईच मानत असल्यामुळे अमृताला तो आपल्या सख्ख्या बहिणीईतकेच प्रेम करतो. बिना काक या अभिनयासोबत राजकारणात देखील सक्रिय आहेत. राजस्थान पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यांनी सलमान सोबत मैने प्यार क्यूँ किया, गॉड तुस्सी ग्रेट हो या चित्रपटात आईच्या भूमिका निभावल्या होत्या. तर त्यांची मुलगी अमृता ही उत्तम सिंगर आहे. सलमाननेच त्याच्या अनेक चित्रपटात तिला गाणी गायची संधी दिली होती. रेडी, गॉड तुस्सी ग्रेट हो, अपने, बॉडीगार्ड यासारख्या चित्रपटाची तिने गाणी गायली आहेत.
अमृताच्या लग्नात सलमान प्रत्येक क्षणी तिच्याच सोबत असल्याचे पाहिले जायचे . घरातील सदस्याप्रमाणे तो अगदी बनियन घालूनच तिथे वावरत असल्याचे फोटोतून स्पष्ट होते. हळदीच्या प्रसंगी तर सलमान एका हटके स्टाईलमध्ये अमृताला हळद लावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लेकीच्या लग्नातील सलमान सोबतची ही एक गोड आठवण बिना काक यांनी आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर केलेली पाहायला मिळते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *