सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos

सयाजी शिंदेने जितक्या खलनायकाच्या (कडू) भूमिका निभावल्या असतील तितकाच हा माणूस म्हणून साखरेहूनही गोड आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यानि मिळवला होता.

१३ जानेवारी १९५२ साली सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातूनच बीए, डीएड पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पैशाअभावी शिक्षणाबरोबरच रात्री पाटबंधारे खात्यात वॊचमनची नोकरी स्वीकारली. त्या नोकरीत महिन्याला १६५ रु. मिळायचे त्यातील दीडशे रु. घरखर्चाला द्यायचे आणि सगळे मित्र मिळून अवघ्या १५ रु. (पार्टी करायचे) केळी खायचे. पुढे शिक्षणानंतर नाटकात काम करण्याची इच्छा होती त्यामुळे साहजिकच मुबईच्या दिशेने पावले निघाली.

१९९५ साली ‘ आई ‘ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. यांनतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सयाजी शिंदेंचे आर्टिकल छापण्यात आले होते. त्या आर्टिकलवर बॉलीवूड स्टार मनोज वाजपेयी याची नजर गेली आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना सयाजी शिंदेंचे नाव सुचवले.त्यावेळी राम गोपाल वर्मा ‘ शूल ‘ चित्रपट बनवत होते. त्यात सयाजीने ‘ बच्चू यादव’ ची भूमिका साकारली आणि बोलीवूडमध्ये सजीची धमाकेदार एन्ट्री झाली.


या चित्रपटातील भूमिकेमुळे फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन अवॉर्डहि मिळाला. त्यांनतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी ‘ या चित्रपटाची निर्मिती आणि ‘ डँबीस ‘ या चित्रपटाची सहनिर्मिती केली.


दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली. काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं बनवण्याचा संकल्पही त्यांनी हाती घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक दुष्काळी गावांमध्ये वृक्षारोपणाची कामे हाती घेतली, त्यामुळे अनेक गावातील पाण्याचा स्तर उंचावला. त्यांच्या या कार्याला सलाम , त्यांचा हा संकल्प नक्कीच यशस्वी होईल एवढीच अपेक्षा.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *