सनम बेवफा चित्रपटातील सलमान खानची “ही” हिरोईन आता दिसते अशी… ओळखणेही झाले कठीण

बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. यातील काही अभिनेत्री आजही बॉलिवूड क्षेत्रात कार्यरत आहेत तर काहींनी या क्षेत्रापासून दूर राहणे पसंत केले आहे. १९९१ साली सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला “सनम बेवफा” हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात सलमान खानची हिरोईन बनली होती अभिनेत्री “चांदणी”. चांदणी हिने ह्या चित्रपटात रुखसार खानची भूमिका बजावली होती. या पहिल्याच चित्रपटामुळे चांदणीला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.

यानंतर तिने बॉलिवूडचे हाहाकार, आझाद हे चित्रपट साकारले परंतु यानंतर तिला या क्षेत्रात काम मिळणे कठीण होऊ लागले. त्यामुळे नाईलाजाने तिला या क्षेत्रापासून दूर जावे लागले. चांदणीने सतीश शर्मा सोबत लग्न केले त्यानंतर तिने आपले नाव “निवेदिता शर्मा” असे बदलले. लग्न करून ती अमेरिकेतील ओरनाल्डो या ठिकाणी स्थायिक झाली आहे. वयाच्या ५ व्या वर्षांपासून तिला नृत्याची आवड होती तेव्हापासून तिने याचे प्रशिक्षण घेतले होते. आपली हीच आवड जोपासत तीने ओरनाल्डो येथे डान्सचे इन्स्टिट्यूट उभारले आहे. यातून अनेकांना ती इंडियन क्लासिकल डान्सचे प्रशिक्षण देत आहे. एवढेच नाही तर तेथील अनेक मंचावर तिने आपल्या नृत्याची कला सादर केली आहे.
चांदणीला दोन मुली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री “करीना आणि करिश्मा ” हीच नावे तिने आपल्या मुलींना दिली आहेत. अभिनय क्षेत्रापासून बरेच दिवस गायब झालेली ही चांदणी अगोदरपेक्षा आता खूप वेगळी दिसत असल्याने तिचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *