“आम्ही सारे खवय्ये” मधून प्रेक्षकांसमोर येणारा प्रसिध्द शेफ ‘देवव्रत जातेगावकर’ आपल्या अंगी असलेल्या विविध कालागुणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. खरं तर जेवण बनवणे ही जशी कला आहे तितकीच ती सजवणे हा देखील खुप मोठ्या कुतूहलाचा विषय मानला जातो. यात विशेष प्राविण्य मिळवून देवव्रत आपले नाव चांगलेच प्रकाशात आणताना दिसतो. देवव्रत जातेगावकर यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात… तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, देवव्रत जातेगावकर हे बॉलिवूड आणि मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते “सदाशिव अमरापूरकर” यांचे जावई आहेत.

सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदा अमरापूरकर यांना तीन अपत्ये केतकी, सायली आणि रिमा. त्यापैकी केतकी अमरापूरकर हिने प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी लग्नाची गाठ बांधली. केतकी अमरापूरकर- जातेगावकर यांनी नुकत्याच येऊन गेलेल्या “पुरुषोत्तम” या मराठी चित्रपटात नायिकेची भूमिका बजावली होती तर चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा अमरापूरकर यांनी सांभाळले होते. या चित्रपटाची निर्मिती दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा यांनी सांभाळली होती. सदाशिव अमरापूरकर आज हयात नसले तरी त्यांच्या रूपाने त्यांच्या मुली कला क्षेत्राशी निगडित असलेल्या पाहायला मिळतात. बॉलिवूड सृष्टीसोबतच मराठी सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या अनेक अजरामर भूमिका कायम रसिकजनांच्या स्मरणात राहतील एवढे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *