सचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story

सचिन खेडेकरांचा जन्म १४ मे १९६५ साली मुंबईत झाला. बांद्रा, मुंबई येथील TSEC या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ प्रायव्हेट कंपनीत नोकरीही केली. नोकरी करता करता रंगभूमीवरही आपले नशीब आजमावले. त्यातच मन रमू लागल्याने पूर्ण वेळ रंगभूमीलाच अर्पण केले. पुढे त्याला चांगल्या भूमिकाही मिळत गेल्या. त्याने अभिनित केलेल्या ‘सैलाब’ या टीव्ही मालिकेमुळे बेस्ट ऍक्टरचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला.

ईटीव्ही मराठीवरील ‘ कोण होईल मराठी करोडपती’ या मालिकेसाठी सचिनची निवड करण्यात आली. त्याने ती उत्तमरीत्या संभाळलीही. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगलचा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे प्रेक्षकांची वाह वा! मिळवली.

सचिन खेडेकर यांचं १९९३ साली जलपा हिच्याशी लग्न झाल. सचिन खेडेकर आणि जलपा खेडेकर याना दोन मुले देखील आहेत. सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत.

‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या दर्जेदार मराठी चित्रपटामुळे त्याला आणि मराठी चित्रपटसृष्टीला घवघवीत यश मिळाले. त्यासाठी ‘झी गौरव’ पुरस्काराने सन्मानितही केले. गोलमाल अगेन , रुस्तम,तेरे नाम, जिद्दी, जुडवा २, कोकणस्थ, राजवाडे अँड सन्स, काकस्पर्श, दशावतार, अग्निपथ विधिलिखित अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या.

केवळ चित्रपटच नव्हे तर टीव्ही मालिकेतही भूमिका साकारून आपले अस्तित्व या क्षेत्रात कायम टिकवून ठेवले. सैलाब, इम्तिहान, थोडा है थोडे कि जरुरत है, अभिमान या हिंदी टीव्ही मालिकाही आपल्या अभिनयाने गाजवल्या. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यावर आधारित ‘गुलजार, बात पश्माने कि’ याद्वारे कवितांचे सादरीकरणही केले.


ई टी. वी. मराठी वरील कोण होइल मराठी करोडपती या कोन बनेगा करोडपती या हिंदी मालिकेवर आधारित असलेल्या मालिकेत सचिनने सुत्रसंचालनाचे काम केले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *