संभाजी मालिकेतील या अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? जाणून तुम्ही अवाक व्हाल

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. कोंडाजी बाबा जंजिऱ्यात जाऊन सिद्दीचा विश्वास मिळवू पाहत आहेत आपले डाव यशस्वी होण्यासाठी त्यांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते ते आता तुम्हाला मालिकेतून अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढताना दिसत आहे. मालिकेत आता बऱ्याच नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे त्यात सिद्दी खैर्यतची व्यक्तिरेखा त्या कलाकाराने चांगलीच दमदार साकारलेली पाहायला मिळते.

इथेच कोंडाजी बाबांच्या दिमतीला हजर असणारी स्री कोण? याची उत्सुकता पाहायला मिळते. ही भूमिका साकारली आहे “स्वरांगी मराठे” या अभिनेत्रीने . त्यामुळे येणाऱ्या काही भागात ही व्यक्तिरेखा कोणकोणत्या खेळी करते हे पाहणे रंजक होणार आहे. स्वरांगी मराठे हिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. वयाच्या १० व्या वर्षी स्वरांगी हीने आभाळमाया या लोकप्रिय मालिकेत चिंगी साकारली होती. ज्येष्ठ घरंदाज गायक राम मराठे हे तिचे आजोबा तर रंगकर्मी मुकुंद आणि केतकी मराठे यांची स्वरांगी ही एकुलती एक कन्या. स्वरंगीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत त्यामुळे अभिनयासोबतच ती गायनातदेखील पारंगत आहे. स्वप्नपंख (नाटक), मिशन काश्मीर, गोंदण, बाजीराव मस्तानी, पोरबाजार या हिंदी तसेच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये ती झळकली आहे. दिवाळी पहाट, नादब्रह्म सारख्या अनेक रंगमंचावर तिने आपल्या गायनाची कला सादर केली आहे. तुम्हाला आठवत असेल सह्याद्री वाहिनीवर अंताक्षरीचा कार्यक्रम प्रसारित होत होता त्यात तिने सूत्रसंचालनही केले होते. २०१६ साली स्वरांगी निखिल काळे सोबत विवाहबंधनात अडकली. लग्न वैदिक आणि साधेपणाने करून तिने हा पैसा वेगवेगळ्या १७ सामाजिक संस्थांना देऊ केला. त्यामुळे तिचे हे लग्न खूपच चर्चेत आले होते. भपकेबाज लग्न सोहळ्यावर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या अनेकांपुढे नवा आदर्श तिने घालून दिला होता.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *