संभाजी महाराज्यांच्या आई “स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई” यांच्या खऱ्या समाधीबाबत जाणून तुम्हाला धक्का बसेल. जाणकारांनी केला खुलासा

काही दिवसांपूर्वी युट्यूब वर एक व्हिडिओ पहिला, पाहून तर धक्काच बसला. महाराणी संभाजी महाराज्यांच्या आई “स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई” यांची समाधी अत्यंत दुरावस्तेत पाहायला मिळाली. इडियट ट्रेकर्स ग्रुपच्या THE PATIL’S या YOU TUBE चॅनेल ने हा व्हिडिओ अपलोड केला होता. पाहून राहवलं नाही स्वराज्याच्या महाराणी सईबाई यांच्या समाधीची इतकी दुरावस्था पहावली नाही, मग आम्ही इडियट ट्रेकर्स ग्रुपच्या काही लोकांना संपर्क साधला. त्यांनी लगेच याची माहिती आणि काही फोटो आम्हाला पाठवले. पद्मावती मंदिरासमोरच्या चबुतऱ्यावर महाराणी सईबाई आऊसाहेबांची समाधी आहे समाधीबाबत थोडी साशंकता आहे. तेथील गावकरी आणि जाणकार लोकांचे म्हणणे काही औरच आहे.

तेथील जाणकार सांगतात कि “स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई” यांची हि खरी समाधी नसून त्यांची खरी समाधी हि राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल गावात आहे. हीच राजगड परिसरातील स्थानिक रहिवाशांची हि आढळ भावना आहे. यामुळे इडियट ट्रेकर्स ग्रुपच्या काही व्यक्तीनि तेथे जाऊन जे पहिले ते पाहून धक्काच बसला.
वेल्हे गावातून पाल गावाकडे जात असताना डाव्या बाजूला एक पायवाट लागली. भातकाढणी झालेल्या शेतातून, दोन शेतांतील चिंचोळ्या बांधावरून आणि गुंजवणे नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावरून चालत गेल्यावर समोर जे दिसलं ते मन विदीर्ण करून टाकणार होत. एका शेताच्या कोपऱ्यात चार दिशांना ठेवलेले चार दगड. मध्यभागी तीन शिळा आणि वाऱ्यावर हेलकावणारा एक जरीपटका. हीच होती स्वराज्यलक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती, शंभू राजांच्या मातोश्री सईबाई यांची समाधी.

काय म्हणावं या परिस्थितीला? आधीच समाधीच्या स्थळाबद्दल संभ्रम आणि दोन्ही ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था. सईबाई महाराणी साहेबांच्या समाधीची किती ही उपेक्षा? याही ठिकाणी कुठलाच नामफलक नाही. मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक सुद्धा नाही. ना कसला डोलारा न कसल बांधकाम ना कसलं सुशोभिकरण. एकाच महाराणीच्या दोन समाध्या असून दोन्हीही उपेक्षित त्यांच्याच स्वराज्यात. दोन्ही ठिकाणी जे पाहिलं ते मन सुन्न करणार होत.

यावर इडियट ट्रेकर्स ग्रुपने खुलासा करण्यासाठी पुरातत्व खात्याला माहितीचा अधिकार मागितला. माहिती अधिकारात जे लिहलं होतं ते वाचून आणखीनच धक्का बसला. पुरातत्व खात्यात स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीबाबत काहीच माहिती नाही. त्यांनी पात्रात ह्या दोन्ही समाधीबाबत काहीही पुरावे नसल्याचे पात्रात स्पष्ट्पणे सांगितले. मग यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी इडियट ट्रेकर्स ग्रुप आणि एक्का फौंडेशनचे प्राजक्त झावरे-पाटील, प्रवीण काळे, अतुल आवटे, प्रवीण शिंदे, दादासाहेब थेटे, निलेश मोरे, सचिन घोडे हि मंडळी अधिक माहिती गोळा करताहेत. लवकरच त्यांना ह्या कामात यश मिळो हीच अपेक्षा.
Video link – https://youtu.be/w5wVbrcIxiY

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *