श्रुती मराठे हीच जन्म ९ ऑक्टोबर १९८५ साली संभाजीनगर, चिंचवड, पुणे येथे झाला. पुरुषोत्तम आणि स्मिता मराठे यांची हि कन्या. श्रुतीला एक मोठी बहीण आहे त्यांचं नाव प्रीती मराठे – तोमर. सध्या त्या ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत.

श्रुतीच बालपण पुण्यातच गेलं. पुण्याच्या सेन्ट मीरा गर्ल्स कॉलेज पुणे येथून शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर त्या मॉडेलिंग कडे वळल्या लहानपानापासूनच श्रुतीला अभिनयाची आवड होती पण काही केल्या त्यांना मराठी सिनेश्रुष्टीत काम मिळेना म्हणून त्या कॉलीवूड (तमिळ सिनेमा) कडे वळल्या.

श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला. तिने चित्रपटात हेमा मालिनी ह्या नावाने पदार्पण केले पण त्यानंतर ते बदलून् श्रुती प्रकाश असे नाव ठेवले. तिचा दुसरा तमिळ चित्रपट नान अवन इल्लै २ चांगलाच लोकप्रिय ठरला.

यानंतर २००८ साली श्रेयश तळपदेंच्या “सनई चौघडे” ह्या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटात पदार्पण केले. तिला एका पाठोपाठ एक मराठी सिनेमे मिळत गेले “असा मी तस मी” “लागली पैज” “तिचा बाप त्याचा बाप”. यानंतर ती मराठी मालिकांतही दिसू लागली “संत सखू” हि तिची पहिला मराठी मालिका. यानंतर तिला झी वाहिनीने प्रस्तुत केलेल्या “राधा हि बावरी” या मालिकेत घसघशीत यश मिळाले. तिने लग्नबंबाळ या मराठी नाटकात काम हि केले. सध्या झी मराठीवरील “जागो मोहन प्यारे” हि मालिका चांगलीच गाजतेय.

२०१३ साली “तुझी माझी लव्ह स्टोरी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रुतीला गौरव घाणेकर यांच्याशी प्रेम जुळलं आणि ६ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी लग्न केलं. सध्या दोघेही मुंबईत स्थायिक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *