श्रीदेवी यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती फोटोसह

श्रीदेवी यांचं खरं नाव ‘श्रीअम्मा यंगर अय्यपन’ असं होत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली सिवकाशी, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील अय्यपन हे खूप मोठे वकील होते तर आई राजेश्वरी ह्या हाऊस वाइफ होत्या. श्रीदेवी यांना दोन सावत्र भाऊ हि आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या ४ वर्षापासून चित्रपटात पदार्पण केले. थुनाईवन असं चित्रपटाचं नाव असून त्यात भगवान मुरूगन यांची भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांनी १९७८ साली ‘सोलहवाँ सावन’ या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. तर ‘हिम्मतवाला’ ह्या चित्रपटातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

राकेश रोशन यांच्या ‘जाग उठा इनसान’ च्या सेटवर मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच प्रेम जुळलं आणि १९८५ साली मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी लग्न केलं. पण पुढे ते फार काळ टिकलं नाही. १९८८ साली दोघे विभक्त झाले. मिथुन चक्रवर्ती यांचं यापूर्वीच योगिता बाली यांच्याशी विवाह झालेला.

पुढे ती हिंदी चित्रपटांत खूप व्यस्त राहिली, तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपर हिट होऊ लागले. सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इन्डिया, चालबाज़, लम्हे, खुदा गावाह आणि जुदाई असे तिचे चित्रपटही खूप प्रसिद्ध झाले. १९९६ साली त्यांनी ‘बोनी कपूर’ यांच्याशी विवाह केला.


बोनी कपूर यांचं हि हे दुसरं लग्न होत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव ‘मोना शौरी कपूर’ असं होत. बोनी कपूर आणि मोना याना दोन मुले झाली त्यांची नावे अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर. (अर्जुन कपूरने ही बॉलीवुड मध्ये पदार्पण करून चांगले सिनेमेही केलेत)‘बोनी कपूर’ आणि ‘श्रीदेवी’ यांनाही “जान्हवी कपूर आणि खुशी कपूर” अशा दोन मुली आहेत. जान्हवी कपूर यांनीही बॉलीवुड मध्ये पदार्पण केले आहे. ‘धडक’ असं तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव, चित्रपट अजून रिलीज झाला नसून तो मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ हा चित्रपट मराठी चित्रपटतला ‘सैराट’ चा रिमेक आहे.

वयाच्या ५४ व्या वर्षी (२४ फेब्रुवारी २०१८ रोजी) दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *