shubham karoti actress

झी मराठी वाहिनीने नेहमीच उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या त्यातीलच एक म्हणजे “शुभं करोती” ही मालिका. २०१० साली ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होत होती. प्रिया बापट, उमेश कामत, आनंद अभ्यंकर, अद्वैत दादरकर, कुशल बद्रिके, मानसी मागिकर, ओंकार कर्वे यासारखे अनेक कलाकार मंडळी या मालिकेला लाभली होती. मालिकेत प्राचीची भूमिका साकारली होती “सुजाता जोशी” या अभिनेत्रीने. काही मोजके मराठी चित्रपट, नाटक आणि रिऍलिटी शोमधून सुजाता जोशी हिने अभिनय साकारला परंतु बऱ्याच वर्षांपासून ती या सृष्टीपासून दूर आहे आज तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

sujata joshi actress
sujata joshi actress

सुजाता जोशी या अभिनेत्रीने मराठी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीएस्सी आणि वकिलीची पदवी देखील तिने प्राप्त केली. साडे माडे तीन या चित्रपटाच्या माध्यमातून तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. मध्यम वर्ग: द मिडल क्लास, जावई विकत घेणे आहे या काही मोजक्या चित्रपटातही ती झळकली. झी मराठीच्याच फू बाई फू शोमधून गिरीश ओक यांच्यासोबत परफॉर्मन्स करून प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचा प्रयत्न केला. एका लग्नाची गोष्ट हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका हा प्रवास सुरू असतानाच सुजताने आपले पती सलील जोशी यांच्यासोबत लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुजाता सध्या लंडन येथेच स्थायिक असून युके येथील झी टीव्हीचा शो साकारत आहे. Zee companion friday fever या शोमधून ती सुत्रसंचालिका बनून अनेक सेलिब्रिटींचा इंटरव्ह्यू घेते. यात तिने ऋषी कपूर हयात असताना त्यांची मुलाखत घेतली होती. इतकेच नाही तर चला हवा येऊ द्या मधील निलेश साबळे आणि भाऊ कदम ह्यांची देखील मुलाखत तिने घेतली होती. सुजाता परदेशात असूनही आजही ती कला क्षेत्राशी निगडित आहे हे जाणून तुम्हाला आनंद वाटेल. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *