झी मराठीवरील “लागीर झालं जी” हि मालिका सध्या खूप गाजतेय. यंग जनरेशनला आर्मीचे महत्व कळावे यासाठी झी मराठीने हि मालिका बनवली . अजिंक्य, विक्या, राहुल्या, शीतल, भय्यासाहेब, जयडी अशी भन्नाट पात्रे या मालिकेत लक्ष वेधून घेतात. अजिंक्य (नितीश चव्हाण) आणि शीतल (शिवानी बावकर) हि या मालिकेतील प्रमुख पात्रे आहेत.शिवानी बावकर हि मूळची मुंबईची तिने तिचे शालेय शिक्षण मुंबईतच घेतले कॉलेज मध्ये असताना तिने जर्मन भाषा विषय निवडला,

shivani baokar
shivani baokar

त्यातूनच तिला जर्मन भाषेची गोडी निर्माण झाली आणि तिने त्यात वर्चस्व मिळवले इतकेच नव्हे तर तिने जर्मन भाषा एक्स्पर्ट म्हणून एका it कंपनीत वर्षभर कामही केले. कंपनीत असताना तिला तिच्या मैत्रिणींनी तू फिल्म इंडस्ट्रीत ट्राय कर असे सल्ले हि दिले आणि त्यांच्या सांगण्यावरून तिने एका खासगी फिल्म अकॅडमिमधून शिक्षण घेतले आणि तिथूनच तिची “लागीर झालं जी” या मालिकेसाठी निवड झाली. सुरवातीला तिला मराठी भाषा बोलताना फार अडचणीही येत होत्या.

shivani baokar
shivani baokar

“लागीर झालं जी” ह्या मालिकेत असणारी शीतल हि बिनधास्त गर्ल आहे. तिचे बेधडक वक्तव्य प्रेक्षकांना भावून जाते. तिने नुकताच “उंडगा” हा चित्रपट हि केला परंतु चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. तिचा आणखीन एक चित्रपट येतोय, आशा आहे तो चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *