“शीतल आणि अजिंक्य” हनिमूनसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल. फोटो होत आहेत व्हायरल….

शितलची पहिलीच वटपौर्णिमा नुकतीच पार पडली असतानाच पोस्टमन तिच्या हातात अजिंक्यचे जॉईनींग लेटर देऊन जातो.आता लवकरच अजिंक्य आपल्यापासून दूर जाणार असल्याची जाणीव तिला होऊ लागते. त्यामुळे मालिकेत ते दोघेही हनिमूनसाठी महाबळेश्वर येथे गेले आहेत. तसे पाहता महाबळेश्वर हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याचा मोह मालिकेच्या निर्मात्यालाही वाटला असावा म्हणून शीतल आणि अजिंक्य च्या हनिमूनसाठी या ठिकाणची निवड केली असावी.

महाबळेश्वर येथील पर्यटक ” लागींर झालं जी “च्या कलाकारांना पाहून भारावून जाताना दिसली. काही पर्यटकांनि त्यांच्या चित्रीकरण चालू असतानाचे फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

आता पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे महाबळेश्वर येथील रूपच मेघांनी भरून गेले असल्याचे चित्र दिसत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने अजिंक्यने धरलेली छत्रीसुद्धा उल्टी झाल्याचे आढळून आले. वाऱ्याच्या प्रवाहात दोघांना तग धरून ठेवनेही अवघड जाऊ लागले होते.अशातच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. आता थोड्याच दिवसात या ठिकाणचे शूटिंग कसे झाले हे प्रत्यक्षात तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहेच.३ जुलै रोजी आपल्याला हा भाग लगीर झालं जी मालिकेत पाहायला मिळणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *