सगळ्यांचा कुतुहलाचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची तलवार कीती किलोचि किती लांबीची आणि ती कोणत्या युद्धात वापरली तसेच आणखी कायकाय पराक्रम तलवारीच्या नावावर असतिल असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. उदाहरणार्थ आपण ५वी ते १०वी ला जाऊपर्यत ५०ते १०० पेन बदलतो तर शिवाजी महराजांनी ३५ वर्षाच्या कालावधी मध्ये एकच तलवार वापरली असेल का? तलवारीमध्ये अनेक प्रकार असतात जसे आपणघरी लिहण्यासाटी वेगळा पेन वापरतो परीक्षेसाठी वेगळा ईतर कामासाठी वेगळा आपण सामान्य माणसं जर इतके पेन वापरतो तर एक राजा सुद्धा वेगवेगळ्या तलवारी नक्कीच वापरत असेल. शिवाजी महाराज्यांना लहानपनापासूनच लष्करी प्रशीक्षन होतच. १६व्या शतकातला तो काळ ढाल तलवार लढाया यांचाच होता. शिवाजी महाराजांकडे अनेक तलवारी होत्या त्यापैकी ३ तलवारी प्रसिद्ध आहेत. त्या तीन तलवारी म्हणजे भवानी तलवार, तुळजा तलवार आणि जगदंबा तलवार. चला तर मग पाहुयात ह्या तलवारीची खरी कहाणी काय आहे. भवानी तलवार म्हणजे भवानी मातेने दिलेली नसून त्याची खरी कहाणी ती अशी

७ मार्च १६५९ या दिवशी शिवाजी महाराज कोकणच्या दवऱ्यावरती असताना अंबाजी सावंतांना हि तलवार मिळाली. त्याच झालं असं कि कोकणामध्ये बांदा नावाच्या बंदरावर ओहोटी लागली होती आणि ह्या ओहोटीमध्ये पोर्तुगिजांच एक जहाज अडकून पडलं होत . ह्या संधीच फायदा घेऊन अंबाजी सावंत यांनी ह्या जहाजावर हल्ला चढवला. आणि ह्या हल्ल्यात त्यांना जी संपत्ती मिळाली त्यातली एक देखणी हिरेजडित अप्रतिम अशी एक तलवार होती तीच हि भवानी तलवार. त्या जहाजाचा कॅप्टन होता “दि ओक फर्नांडिस” त्याचीच हि तलवार.

शिवाजी महाराज महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा सप्त कोटेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी असताना त्यांची भेट अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांच्याशी झाली. आणि भेट म्हणून कृष्णजींनी शिवाजी महाराजांना हि भवानी तलवार दिली. परंतु शिवाजी राजे त्याकाळी कोणतीही भेटवस्तू स्वीकारत नव्हते आणि जरी स्वीकारली तरी त्याबदल्यात त्याहून काही मौल्यवान वस्तू भेटदेणारयाला देत असत. हि तलवार पाहताच क्षणी ती महाराजांना खूपच आवडली तेव्हा त्यांनी कुष्णाजींना विचारले कि हि तलवार आपणाला कोठे मिळाली. तेव्हा झालेली सर्व हकीकत त्यांनी महाराजांना सांगितली. तेंव्हा कृष्णाजीना परत भेट म्हणून राजांनी कृष्णजींना ३०० होण सोनं दिल अशी नोंद आहे(आज त्याची किंमत काढली तर १ होन म्हणजे २ तोळ सोन ३०० होन म्हणजे ६०० तोळ सोनं … म्हणजे आजची ह्या तलवारीची किमान किंमत ७ कोटी २० लाख रुपये आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *