शिवजयंतीच्या मुहूर्तावर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील ह्या अभिनेत्रीने केले गरिबांसाठी पोटभर जेवणाची कायमस्वरूपी सोय

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील रानुआक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महंगडे हिने एक स्तुत्य उपक्रम सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श करून दिला आहे. “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ अंतर्गत अश्विनी महंगडे हिने आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्याचे अनोखे कार्य हाती घेतले आहे. “रयतेचे स्वराज्य परिपुर्ण किचन” या अंतर्गत केवळ ३५ रुपयात सामान्य नागरिक, कष्टकरी, कामगारवर्ग यासाठी पोटभर जेवण उपलब्ध करून देणार आहे. पुणे आणि मुंबईसह संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

“रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठाण” ह्याची स्थापना काही दिवसांपूर्वीच करण्यात आली संस्थेच्या संस्थापक स्वतः अश्विनी महंगडे या आहेत. याशिवाय या उपक्रमातून बेघर लोकांसाठी मोफत जेवणाची सोय देखील केली जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये हाच एक उद्देश त्यांनी समोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अश्विनी महंगडे यांनी ‘महावारी’ वेबसिरीजची निर्मिती केली. ह्यातून महिला, मुलींना आपल्या आरोग्याबाबतच्या समस्या आणि त्यासंबंधी जाणीव करून देण्याचा उपक्रम राबवला. या वेबसिरीजला प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” ची स्थापना करून असेच स्तुत्य उपक्रम अश्विनी महंगडे यापुढेही हाती घेणार आहे त्यांच्या ह्या उपक्रमाचे स्वागत अनेकांनी केले आहे. पुणे, मुंबईत अशा आणखी ४ शाखा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत. आणि त्यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *